महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई आणि पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 19, 2025, 11:44 PM IST
महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील title=

Donald Trump Net Worth:  डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.  संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचं वातावरण आहे. ट्रम्प यांच्या शपतविधीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्षपदी निवड झाल्यापासून  ट्रम्प यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील विविध देशांमध्ये ट्रम्प यांची मालमत्ता आहे. भारतातही ट्रम्प यांच्यानावर आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे.   महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे.  मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. जाणून घेऊया ट्रम्प यांची भारतात कुठे कुठे संपत्ती आहे. .. 

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 7,100 कोटी रुपये) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ट्रम्प टॉवर असतील अशी  देखील चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबध आणकी चांगले होणार आहेत. 

भारतात अनेक नवीन प्रकल्पांमध्ये ट्रम्प गुंतवणूक करणार आहेत. नोएडा, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक टॉवर, कार्यालयीन इमारती, व्हिला तसेच गोल्फ कोर्स यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मुंबईत ट्रम्प टॉवरचे लाँचिंग झाले. यावेळी ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती ट्रिप ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिली. 
भारतात असलेल्या चार टॉवरची किंमत 7500 कोटी रुपये

सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत. 30 लाख स्क्वेअर फूटाच्या या टॉवरमध्ये 800 आलिशान निवासी सदनिका आहेत. त्यांची किंमत 6 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चार प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात एक ट्रम्प टॉवर आहे. तेथेही एक नवीन कॉम्पलेक्स बांधले जाणार आहे. यात निवासी टॉवरसह, ऑफिस स्पेस, असणार आहेत. याशिवाय नोएडा, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये ट्रम्प ब्रँडेड गोल्फ कोर्स आणि व्हिला बांधण्याची योजना आहे.