Arjun Kapoor - Malaika Arora : बॉलिवूड मलायका अरोडा आणि अर्जुन कपूर बऱ्याच काळानंतर नॅशनल टेलिव्हिजवर बोलताना दिसले. यावेळी अनेक कलाकार हे शांत झाले. ते दोघं सोनी टिव्हीच्या डॉन्स रिअॅलिटी शो IBD Vs SD च्या ग्रॅंड फिनालेमध्ये एकत्र दिसले. तिथे अर्जुन हा त्याचा आगामी चित्रपट 'मेरे हसबॅन्ड की बीवी' च्या प्रमोशनसाठी भूमि पेडनेकर आणि हर्ष गुजरालसोबत पोहोचला होता. याच शोमध्ये मलायका ही परिक्षक आहे.
आता 'इंडियाज बेस्ट डांसर वर्सेज सुपर डांसर्स' च्या ग्रॅंड फिनालेच्या एपिसोडमध्ये सुत्रसंचालक हर्ष लिम्बाचियानं इमोजीचा खेळ ठेवला होता. ज्यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या होत्या आणि मिथुन चक्रवर्ती यांना त्या खेळाचे परिक्षक बनवण्यात आलं होतं. एका टीममध्ये 'मेरे हसबॅन्ड की बीवी' ची कास्ट अर्जुन कपूर, भूमि पेडनेकर, हर्ष गुजराल होते आणि दुसऱ्या टीममध्ये शोचे परिक्षक मलायका अरोरा, रेमो डिसूजा आणि गीता कपूर होते.
खेळाच्या सुरुवातीला दोन्ही टीमनं दोन-दोन प्रश्नाची योग्य उत्तर दिलं. तिसऱ्या इमोजीला पाहून चित्रपटाचं नाव सांगण्यासाठी दोन्ही टीम नाव सांगू लागतात. तेव्हा अर्जुन मलायकाला म्हणाला, 'तू कशासाठी स्पर्धा करते? तू ट्रॉफी देणार आहेस?' तर मलायका उत्तर देत म्हणाली, 'स्पष्टपणे, मी स्पर्धात्मक आहे. मला ट्रॉफी हवी आहे.' त्यानंतर लगेच अर्जुन कपूर म्हणाला, 'तिच्या स्पर्धेविषयी माझ्या पेक्षा जास्त कोणाला माहित आहे.' हे ऐकून तिथे असलेले सगळे हसू लागले. मलायकानं देखील हसत म्हटलं की 'पुढे खेळ सुरु करा.'
त्यानंतर पुढे आणखी एक इमोजी दाखवण्यात आलं आणि रेमोनं योग्य उत्तर दिलं. तर त्यानंतर हर्ष अर्जुनला म्हणाला, 'तू एका पॉइंटनं मागे आहेस आणि तुला इन्साइक्लोपीडिया म्हटलं जातं की तुला चित्रपटांविषयी सगळं माहित आहे.' त्यानं पुढे तो म्हणाला की 'भूमि आणि हर्षला दाखवतोय आणि शिकवतोय. त्याला एकट्याला सगळी उत्तर द्यायची नाहीत.' त्यावर मलायका म्हणाली, 'ओ हो!' त्यावर भूमिची प्रतिक्रिया विचारण्यात येताच ती म्हणाली, 'मला काही बोलायचं नाही, पुढे खेळ सुरु ठेवा.' मग अर्जुन म्हणाला, 'लोकांचं तोंड कसं बंद करायचं हे मला माहितीये. पाहिलं का.' सगळेच हसू लागतात.
हेही वाचा : 'याची मानसिक चाचणी करा...' 2 महिन्याच्या बाळाच्या आजारपणाची खिल्ली उडवणाऱ्या समय रैनाला अभिनेत्यानं फटकारलं
त्यानंतर आणखी एक इमोजी दाखवलं ज्यावर अर्जुनला आधी कळलंच नाही तर दुसरीकडे मलायकाच्या टीमला याचं उत्तर माहित आहे. त्यावर मलायका अर्जुनला म्हणाला, 'तुला प्रयत्न करायचा आहे का?' त्यावर मलायका म्हणाली, 'आयुष्यात? हो... हो. आयुष्यात खूप प्रयत्न करायचे आहेत.' मलायका म्हणाला, 'कर. अजुनही वेळ आहे.' त्यानंतर पुढे दोन योग्य प्रश्नाची उत्तर देत अर्जुनची टीम हा खेळ जिंकते.