आशिष उदास, मुंबई: 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईत ( ICC Champions Trophy 2025) चा थरार रंगणार आहे. 2017मध्ये लंडन आणि वेल्समध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवली गेली होती त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन होत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलं आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 15 मॅचेस या खेळवल्या जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व मॅचेस दिवसरात्र स्वरुपात खेळवल्या जाणार आहेत. 9 मार्चला स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. आपल्या भारतीय संघाचे सामने कधी आहेत?, कोणते संघ स्पर्धेत भाग घेणार आहेत?, कुठे सामने खेळवले जाणार (ICC Champions Trophy 2025 Teams, schedule) याबद्दल जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा हायब्रिड मॉड्युल स्वरुपात होणार आहेत. BCCI ने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानं टीम इंडियाच्या सर्व मॅचेस दुबईत खेळवल्या जाणार आहेत. पण उर्वरित 7 टीमच्या मॅचेस या पाकिस्तानमधील लाहोर, कराची आणि रावळपिंडीत रंगणार आहे. 19 फेब्रुवारीला कराचीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सलामीची मॅच रंगणार आहे. टीम इंडियाचं मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या लढतीनं सुरू होणार आहे.
23 फेब्रुवारीला दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धींचा हाय व्होल्टेज मुकाबला रंगणार आहे. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.त्याच पराभवाची परतफेड करण्याची टीम इंडियाला संधी आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान 5 वेळा आमनेसामने आलेत त्यावेळा 2 वेळा भारतानं विजय मिळवला आहे आणि 3 वेळा पाकिस्ताननं विजयी झाला आहे.
हे ही वाचा: पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत
भारत आणि ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलीय. न्यूझीलंड, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 वेळा स्पर्धा जिंकली आहे.
8 संघांच्या स्पर्धेतील विजेत्या संघाला 2.24 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकणारी टीम मालमाल होणार आहे. शिवाय उपविजेत्या टीमलाही उत्तम रक्कमेचे बक्षीस मिळणार आहे.
हे ही वाचा: 'हा' क्रिकेटर तुरुंगात भोगत होता शिक्षा, खटला लढणाऱ्या वकिलावरच जडला जीव; जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी
हे ही वाचा: 3 तास 44 मिनिटांचा 'हा' चित्रपट करतोय 14 देशांमध्ये ट्रेंड; 1800 कोटींची केलीये कमाई
एकंदर यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्व मॅचेस या रंगतदार होतील अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करत आहेत.