Asteroid 2024 YR4 : पृथ्वीचा अंत होणार, अंतिम समयी विध्वंसाचं महाभयंकर रुप पाहायला मिळणार असे कैक संकेत आणि इशारे आतापर्यंत देण्यात आले आहेत. आता यात आणखी एका इशाऱ्याची भर पडली असून, विनाशाचं हे पर्व फार दूर नसल्याचच स्पष्ट होत आहे आणि याला कारण ठरणार आहे तो म्हणजे Asteroid 2024 YR4 अर्थात एक भलामोठा धूमकेतू.
प्राथमिक माहितीनुसार हा धूमकेतू 100 किमी रूंदीचा असल्याचं सांगण्यात येतं. वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार 2032 मध्ये हा धूमकेतू पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार असून, त्यावेळी त्याचा वेग प्रतितास 38000KM इतका असेल असं सांगितलं जात आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार जेव्हा हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल तेव्हा त्यामुळं अनेक शहरांचं मोठं नुकसान होणार आहे. यामुळं आता या संकटाशी दोन हात करण्यासाठी चीननंही कंबर कसल्याचं म्हटलं जात आहे. चीननं सध्या यासाठी एक खास लष्करी तुकडी तैनात केली असून, त्यामध्ये स्पेस इंजिनिअर्सचा सहभाग असेल. ही तुकडी या धूमकेतूला दूर लोटण्याचा प्रयत्न करेल.
आतापर्यंत हा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची शक्य्ता 1.3 टक्के इतकीच होती आता मात्र ती वाढून 2 टक्क्यांवर पोहोचली आहे. अद्यापही हा धूमकेतू पृथ्वीपासून कैक हजार किमी अंतरावर असून, तो जसजसा जवळ येईल तसजसा हा धोका आणखी वाढेल असं म्हटलं जात आहे. हा स्फोट झाल्यास हवेत भयंकर स्फोट होणार असून, यातून जवळपास 8 मिलियन टन टीएनटी इतकी उर्जा उत्पन्न होऊन हिरोशिमा नागासाकीहून 500 पट अधिक विध्वंसाचे संकेत दिले जात आहेत. या धूमकेतूच्या धडकेनंतर 50 किमी अंतरापर्यंत नुकसान होणार आहे.
नासाच्या कॅटालिना स्काय सर्वे प्रोजेक्टचे इंजिनिअर डेविड रँकिन यांनी धोका असणाऱ्या संभाव्य जागांची माहिती दिली आहे. त्यांच्या मते हा धूमकेतू दक्षिण अमेरिकेपासून पॅसिफिक महासागर, दक्षिण आशिया, अरबी समुद्र किंवा आफ्रिकेतील कोणत्याही क्षेत्रावर कोसळेल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया, सूदान, नायजेरिया, व्हेनेझ्युएला, कोलंबिया आणि इक्वेडोअर असे देश यामुळं संकटात असल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी 2029 मध्ये अपोफिस नावाचा एक धूमकेतू पृथ्वीवर आदळेल असं म्हटलं गेलं होतं. पण, काही बदलांमुळं हे संकट टळलं. आता हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाईल पण पृथ्वीवर आदळणार नाही हे स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही नासा मात्र या धूमकेतूवरही लक्ष ठेवून आहे.