Gold Price Today: सोन्याची झळाळी कायम आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. या महिन्यात सोन्याने 6 टक्क्यांचा परताना दिला आहे. मात्र असं असलं तरी सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. MCX वर आज सोन्याचे दर 10 ग्रॅम 459 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीदेखील 46 रुपयांनी वाढून 95,632 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीत स्तरावर होणाऱ्या घडामोडी हे यामागचे कारण आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना चांगला परतावा मिळाला होता. मात्र सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे मात्र तोंडचे पाणी पळाले होते. आत्ताही सोन्याची दरवाढी सुरूच आहे.
सराफा बाजारात सोनं 90 हजारांचा दर गाठू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 56,620 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोनं 500 रुपयांनी वाढून 79, 400 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं 410 रुपयांनी वाढून 64,970 रुपयांवर पोहोचला आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 79,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 86,620 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 64,970रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,940 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,662 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,497 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 63,520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 69,296 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 51,976 रुपये
22 कॅरेट- 79,000 रुपये
24 कॅरेट- 86,620 रुपये
18 कॅरेट- 64,970रुपये