Elon Musk Father On Barak Obama : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या एलॉन मस्क यांच्या वडिलांनी म्हणजेच एरॉल मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या नात्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळं साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्याचं पाहायला मिळालं.
बराक ओबामा ‘समलैंगिक’ असून त्यांनी स्त्रीप्रमाणे कपडे घालणाऱ्या पुरुषाशी लग्न केल्याचा दावा मस्क यांच्या वडिलांनी केला आणि एकच खळबळ माजली. अब्जाधीश एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क हे एक दक्षिण आफ्रिकी राजकारणी आणि व्यावसायिक आहेत. अनेक वादग्रस्त गोष्टींमुळं त्यांचं खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरतं. हेच एऱॉल मस्क आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेस कारण ठरतंय ते म्हणजे सिनियर मस्क यांचं एक वक्तव्य.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेत्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्याबद्दल त्यांनी काही अजब दावे केले. 'वाइड अवेक पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, एरॉल मस्क यांनी मिशेल ओबामा या ‘पुरुष असून त्या स्त्रीच्या वेशात राहतात’, असा दावा केला. इतकंच नव्हे, तर बराक ओबामा हे ‘समलैंगिक’ असल्याचंही ते म्हणाले. मिशेल ओबामा यांच्याविषयीच्या दाव्याला आधार देत मस्क यांनी 2014 मधील एका घटनेचा हवाला दिला. जेव्हा विनोदवीर जॉन रिवर्सनं तत्कालीन फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यावर विनोदी टीप्पणी केली होती. तेव्हाही त्यानं ओबामा समलैंगिक असल्याचं म्हटलं होतं.
इथवर न थांबता एरॉल मस्क यांनी त्यांच्या (एलॉन मस्क) मुलाच्या पालकत्वाबद्दलही टीका केली. पिता म्हणून एलॉन यांची असणारी अनुपस्थिती पाहता एरॉल यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. टेस्लाच्या सीईओपदी असणाऱ्या एलॉन मस्क यांनी आपल्या मुलांच्या जीवनातील कैक प्रसंगांना हजेरीच लावली नाही. इन्स्टाग्रामवर विचारण्यात आलेल्या एका लहानशा क्लिपमध्ये त्यांनी आपला मुलगा एक चांगला पिता नसल्याचं म्हटलं होतं.