Chhaava Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक पीरियेड ड्रामाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. पहिला विकेंड संपण्या आधीच या चित्रपटानं एक नवा रेकॉर्ड केला आहे. महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसातच छावानं 130 चं बजेट वसूल करून घेतलं. त्यामुळे हा चित्रपट हिट झाला असं म्हणायला हरकत नाही. चला तर पाहुया किती झाली आहे कमाई...
रिपोर्ट्सनुसार, 'छावा' नं पहिल्या दिवशी 33.1 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 48.5 कोटींची कमाई केली. या नुसार चित्रपटानं तीन दिवसात 118.6 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाइड कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटानं 150 कोटींची कमाई केली. 'छावा' या चित्रपटानं रविवारी 50 कोटींच्या जवळपास गल्ला केला. तर यंजाच्या वर्षातील रविवारी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा पहिल्या क्रमांकावर आहे. छावा आता आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विकी कौशलच्या सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'छावा' हा सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या या चित्रपटाची तिकिटं हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकण्यात येत आहेत. तर प्रेक्षकांकडून असलेली ही मागणी पाहता या चित्रपटाचे लेट नाइट आणि अगदी सकाळचे शो देखील दाखवण्यात येत आहेत.
हेही वाचा : अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...
दरम्यान, हे पाहता सोमवारी म्हणजे आज चौथ्या दिवशी विकी कौशलचा हा चित्रपट कमी वेळात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हटला जात आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीनं कमाई करतोय ते पाहता असं म्हणता येईल की विकीचा हा पहिला चित्रपट असेल ज्यांनं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटात तो लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे.