Pest Control In Mumbai: घरातील झुरळं आणि किटक घालवण्यासाठी अनेकजण पेस्ट कंट्रोल करुन घेतात. मात्र या पेस्ट कंट्रोलमुळं एका कुटुंबाला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. संपूर्ण कुटुंबाला पेस्ट कंट्रोल करणं महागात पडलं आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात पसरलेल्या विषारी वायूमुळं कुटुंबातील चौघे रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील लालबाग परिसरात ही घटना घडली आहे.
मिळाळेल्या माहितीनुसार, हे कुटुंब लालबाग येथील वन रुम किचनच्या घरात राहत होते. त्यांनी अनेकदा घरात पेस्ट कंट्रोल केले होते. गेल्या महिन्यात त्यांनी नेहमीप्रमाणे घरात पेस्ट कंट्रोल केले होते. पण यावेळी मात्र कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. पेस्ट कंट्रोलमुळं घरात विषारी वायू पसरल्याने घरातील चार जणांची प्रकृती गंभीर झालीय. तर 16 वर्षांच्या मुलगा आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. त्यामुळं रुग्णालयाचं बिलदेखील 30 लाख रुपयांहून अधिक येत आहे.
पेस्ट कंट्रोलला अधिक वेळ लागल्याने घरात विषारी वायू पसरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं या दाम्पत्याचा 16 वर्षांचा मुलगा सिद्घार्थ मृत्यूच्या दाढेत अडकला आहे. मागच्या 21 दिवसांपासून त्याच्यावर अग्रीपाडा येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. पेस्ट कंट्रोलमुळं विषारी वायुमुळं मुलाचं हृदय आणि फुफ्फुसं डॅमेज झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीकडून बिनविषारी रसायने वापरत असल्याची खात्री करावी.
रॉकेल किंवा तत्सम द्रवपदार्थाऐवजी पाण्यात मिसळून वापरण्यात येणारी, उग्र वासविरहित व सुरक्षित कीटकनाशके वापरली जातात, याबाबत माहिती घ्यावी.
पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीकडून सुरक्षिततेचे उपाय करण्याची काळजी घ्यावी.
पेस्ट कंट्रोल करण्याच्या दिवशी आणि वेळी घरातील सर्व सदस्यांना माहिती द्यावी.
पेस्ट कंट्रोल करण्याच्या कालावधीत दारं आणि खिडक्या बंद करून ठेवावीत