Facts About Shani Shingnapur : भारत हा त्याच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तिथल्या ऐतिहासिक इमारती, आकर्षित पर्यटक स्थळं यामुळे देशविदेशातील लोक इथे पर्यटनासाठी येतात. हा एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध देश आहे जो त्याच्या भाषा, सांस्कृतिक विविधता आणि इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे. भारतातील महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे घरं काय बँकांनाही दरवाजे नाहीत. इथे चोरीही चोरी करायला घाबरतात. कोणतं आहे हे गाव आणि काय आहे या गावाचं रहस्य जाणून घेणार आहोत.
आजच्या काळात चोरी आणि दरोड्याच्या बातम्या आपण दररोज ऐकत असतो. भारतात एक असे गाव आहे जिथे कोणाच्याही घरांना काय बँकांनाही दरवाजे नाहीत. पण विशेष म्हणजे येथे कधीही चोरी होत नाही. हे गाव आहे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर असून ते अहमदनगरमध्ये आहे. जिथे लोक त्यांचे घर उघडे ठेवतात आणि येथे कोणाच्याही घरात चोरी होत नाही. कारण शिंगणापूर गावाचे रक्षण स्वतः भगवान शनिदेव महाराज करतात, अशी मान्यता आहे.
शनिदेवांना न्यायाची आणि कर्माची देवता म्हणून ओळखलं जातं. शनि ग्रह हा सर्वात धीम्या गतीने आपली स्थिती बदलतो. मात्र असं असूनही शनिची चाल सर्वात महत्वाची मानली गेली आहे. ज्या गावाबद्दल आपण बोलणार आहोत तिथं तर या प्रकोप करणाऱ्या शनिदेवानं आपलं बस्तान बसवलं आहे. या गावात शनि देवाची काळ्या रंगाची प्रतिमा कुठून आली कशी आली याची फारच कमी माहिती आहे. मात्र पुरातन काळी पावसात आलेल्या पुरात ही काळ्या रंगाची मूर्ती वाहात आली अशी आख्यायिका आहे.
शनी शिंगणापूर गावात चोर चोरी करायलाही आजही घाबरतात. लोक मोकळेपणाने आपली घरे उघडी ठेवतात आणि बाहेर फिरायला जातात. शनि शिंगणापूर गावात शनिदेवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. इथे शनिदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भाविक येतात. येथे शनीची 5 फूट उंच मूर्ती आहे. या गावाबद्दल असे म्हटले जाते की शनिदेव स्वतः शिंगणापूर गावाचे रक्षण करतात.
एवढंच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, युको बँकेने शनी शिंगणापूरमध्ये आपली पहिली लॉकलेस शाखा स्थापन केली आहे. पण या बँकेच्या दाराला कोणतेही कुलूप लावलेले नाही. हे एकमेव गाव आहे जिथे चोर चोरी करण्यास घाबरतात. गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे साडेसात वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनि देव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात.