नवी मुंबईतील श्रीमंत एरिया; इथं राहतात करोडपती बिल्डर आणि व्यावसायिक

Navi Mumbai : नवी मुंबईतील श्रीमंत आणि पॉश एरिया मुंबईला टक्कर देतात. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईतही घरांच्या किंमती कोट्यावधीच्या घरात पोहचल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Feb 16, 2025, 10:06 PM IST
नवी मुंबईतील श्रीमंत एरिया; इथं राहतात करोडपती बिल्डर आणि व्यावसायिक title=

Richest Area In Navi Mumbai : नवी मुंबई झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. नवी मुंबई शहर मुंबईला टक्कर देत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे नवी मुंबईला  अधिक महत्व प्राप्त झाले आहे. नवी मुंबई शहरात घरांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. नवी मुंबईत अनेक बिल्डर तसेच बडे उद्योगपती राहतात. जाणून घेऊया नवी मुंबईतील श्रीमंत एरिया कोणते?

नवी मुंबई हे सुनियोजीत वसवलेले शहर आहे. एपीएमसी मार्केट, कोकण भवन, MIDC,  बड्या बँका, आयटी कंपन्या यासह अनेक महत्वाची सरकारी तसेच खाजगी कंपन्यांची कार्यालये आहेत. यामुळे नवी मुंबईत मोठ्या संख्येने नागरी वसाहती निर्माण होत आहेत. मुंबई प्रमाणेत नवी मुंबईत देखील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. नवी मुंबई शहरात मुंबईसारखा गोंगाट नाही यामुळे अनेक जण नवी मुंबईत घर खरेदी करत आहेत.  वाशी, सानपाडा, पामबीच रोड, नेरुळ, सीवूड, बेलापूर, एरोली, खारघर, तळोजा, कामोठे, उलवे तसेच पनवेल या नवी मुंबईतील प्राईम लोकेशन आहेत. 

वाशी 

वाशी ही नवी मुंबईतील सर्वात महागडा एरिया आहे. वाशी हे नवी मुंबई शहराचा स्टार्टिंग पॉईंट आहे. वासी परिसरात अनेक बड्या इमारतींसह अनेक लहान मोठे बंगले तसेच रो हाऊस आहेत.  

सानपाडा

सानपाडा परिसर नवी मुंबईतील प्राईम लोकेशन आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मार्केट असलेले एपीएमसी मार्केट सानपाडा परिसरात आहे. एपीएमसी मार्केट परिसरात व्यवसाय करणारे अनेक व्यापारी सानपाडा परिसरात राहतता.

पामबीच रोड

पामबीच रोड हा नवी मुंबईत सर्वात श्रीमंत एरिया आहे. पामबीच तलावालगत असलेल्या या परिसरात अनेक बडे बिल्डर राहतात. 

नेरुळ

नेरुळ हा नवी मुंबईतील पॉश एरियांपैकी एक आहे. येथे डी वाय पाटील विद्यापीठ, डी वाय पाटील स्टेडियम यासरखे अनेक मोठे कॅम्पस आहेत. यामुळे डॉक्टर, प्रोफेसर, यासह अनेक बडे अधिकारी येथे राहतात. 

सीवूड

सीवूड मध्ये मोठ्या प्रमाणात नव्या नागरी वसाहती निर्माण होत आहेत. यामुळे या परिसरात घरांच्या किंमती देकील झपाट्याने वाढत आहे.  

बेलापूर

बेलापूर परिसरात सिडको कार्यालय, कोकण भवन, रायगड भवन यासारखी अनेक महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. यामुळे या परिसरात देखील अनेक मोठ्या नागरी वसाहती आहेत. येथे देखील घरांच्या किंमती खूप आहेत. 

एरोली

एरोली हे नवी मुंबईच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील परिसर आहे. एरोली परिसर ठाणपासून जवळ असल्याने या एरियाला देखील सध्या मोठी डिमांड आहे. येथे देखील घरांच्या किमंती वाढत आहेत. 

खारघर

खारघर हा नवी मुंबईतील सर्वात महागड्या एरियांपैकी एक आहे. खारघर हा नवी मुंबईतील सुंदर आणि शांत परिसर म्हणून ओळखला जातो. सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, खारघर टेकडी ही ठिकाण येथील प्रेक्षणीय स्थळ आहेत. येथे देखील घरांच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. 

तळोजा, कामोठे, उलवे आणि पनवेल परिसरात देखील सध्या घरांचे दर खूपच वाढते आहेत. 

हे देखील वाचा.... महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात निर्माण होणार भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी