IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल

 बीसीसीआयकडून रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून याप्रमाणे आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे.

पुजा पवार | Updated: Feb 16, 2025, 06:55 PM IST
IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Full Schedule : इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनच वेळापत्रक समोर आलं आहे. बीसीसीआयकडून रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून याप्रमाणे आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना हा 25 मे रोजी होईल. 

आयपीएल 2025 चा ओपनिंग सामना ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर होणार असून हा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. यंदा स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार असून यांच्यात एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी राइवलरी असणारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात वेळापत्रकानुसार दोनदा टक्कर होणार आहे. 23 मार्च आणि 20 एप्रिल रोजी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. तर पंजाबचे 4 होमग्राउंड सामन्यांपैकी एक सामना हा मुल्लांपुर  तर उर्वरित 3 सामने हे धर्मशाला स्टेडियमवर होतील. 20 मे रोजी क्वालीफायर-1 आणि 21 मे रोजी एलिमिनेटर-2 हे सामने हैदराबादमध्ये होतील. 23 मे रोजी क्वालीफायर 2 आणि 25 मे रोजी फायनल सामना हा कोलकातामध्ये होईल. 

नॉकआउट सामन्यांची तारीख : 

20 मे - क्वालीफायर-1
21 मे - एलिमिनेटर
23 मे - क्वालीफयर-2
25 मे - फाइनल सामना