घरच्या घरी बनवा गूळ-शेवेचे लाडू, एकदा खाल्ल्यानंतर प्रत्येकजण करेल कौतुक; जाणून घ्या Recipe

Shev Ladoo Recipe: प्रसिद्ध शेवेचे लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता. यासाठी जास्त साहित्य आणि वेळ लागत नाही.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 16, 2025, 04:39 PM IST
घरच्या घरी बनवा गूळ-शेवेचे लाडू, एकदा खाल्ल्यानंतर प्रत्येकजण करेल कौतुक; जाणून घ्या Recipe  title=
Photo Credit: @BOJANAM/ /YT

How to make Shev Ladoo: भारतात अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात. काही लोक रवा घालून शेव लाडू बनवतात तर काही लोक बेसनाने बनवतात. चवीनुसार काजू, गुलाबपाणी, दूध पावडर, वेलची इत्यादी अनेक गोष्टी चवीसाठी घालून लाडू बनवले जातात. अशा अनेक प्रकारातील एक प्रसिद्ध लाडू म्हणजे शेव. शेव लाडू कमी वेळात बनवता येतात. याशिवाय हे लाडू अगदी कमी पदार्थात, जे झटपट बनवता येतात. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे रिफाइंड साखरेऐवजी गूळ वापरला जातो, ज्यामुळे तो एक आरोग्यदायी गोड पदार्थ बनतो. शेव गुळापासून बनवलेले लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

लागणारे साहित्य 

  • बेसन
  • तेल (तळण्यासाठी)
  • गूळ (चाशनी साठी)
  • काजू

जाणून घ्या कृती 

  • एका भांड्यात बेसन घेऊन पाण्याने घट्ट पीठ मळून घ्या.
  • मळल्यावर तूप लावून परत एकदा मळून घ्या.
  • पुढे शेव मेकरला तुपाने ब्रश करा. बेसनाचा गोळा फोडून शेव मेकरमध्ये ठेवा.
  • गॅसवर पॅन ठेवा आणि तेल गरम करा.
  • शेव मेकरमधून शेव थेट गरम तेलात टाका आणि हलके सोनेरी होईपर्यंत तळा.
  • लक्षात तळताना गॅसची आच जास्त ठेवू नका. मध्यम आचेवर तळून घ्या.
  • शेव तळून, प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर फोडून घ्या.
  • एका पातेल्यात थोड्या पाण्यात गूळ टाकून वितळवून घ्या.
  • एक तार गुळाचे चाशनी तयार करा.
  • चाशनी तयार झाल्यावर त्यात तुटलेली शेव घाला.
  • गॅस बंद करा आणि गूळ मिसळून शेव प्लेटमध्ये काढा. मिश्रण थंड होऊ द्या.
  • मिश्रण थंड झाल्यावर पुढे तुपाने हात ग्रीस करा.
  • लाडू बनवण्यासाठी शेव मिक्स हातात घ्या आणि त्याला लाडूचा आकार द्या.

काजू घालून लाडू 

जर तुम्हाला लाडूमध्ये काजू घालायचे असतील तर काजू तुपात भाजून त्याचे छोटे तुकडे करा. शेव तळून झाल्यावर आणि फोडल्यानंतर तुपाच्या पाकात शेव सोबत काजू मिक्स करावे. यामुळे शेव लाडू अधिक कुरकुरीत, चवदार आणि पौष्टिक होतील.