‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा

Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : शीबा आकाशदीपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य पंचोलीनं तिला भररस्त्यात सेटवर कशी वागणूक दिली याविषयी सांगितलं 

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2025, 03:05 PM IST
‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा title=
(Photo Credit : Social Media)

Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : बॉलिवूड अभिनेत्री शीबा आकाशदीप सध्या तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. तिनं या मुलाखतीत 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुरक्षा’ चित्रपटाविषयी सांगितलं आहे. तिनं सांगितलं की चित्रपटाच्या सेटवर आदित्य पांचोलीनं पंचोलीने मध्यरात्री तिच्याशी गैरवर्तन केले आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तिथे उपस्थित असूनही ते काहीही बोलले नाही किंवा केलं नाही.  

शीबानं 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत या भयानक अनुभवाविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की 'मी दमले होते. मध्यरात्री रडत होते आणि मी दोन चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं होतं. मी माझ्या गाडीत ब्लॅंकेट ओढून झोपत होते. दिग्दर्शक मला सीन समजवणार ती तितक्यात आदित्य पंचोलीनं वळून मला सांगितलं की तू असं कर, तसं कर. मी इतक्या झोपेत होते की मी त्याला सांगितलं की तू तुझं काम करं ना. त्याला या छोट्या गोष्टीचा इतका राग आला की तो शिवीगाळ करु लागला आणि ओरडू लागला. रस्त्यात तिथेच थांबून मध्यरात्री तो माझ्यावर ओरडू लागला.'

या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर शीबा म्हणाली सेटवर अशी वागणूक दिल्यानंतर ती कधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परत गेली नाही. याविषयी बोलताना शीबा म्हणाली, मी घाबरले होते आणि रडत होते. मी निर्मात्यांकडे पाहिलं तर हे सगळं सुरु असताना ते माझ्याकडे पाहत देखील नव्हते. त्यांना कळत देखील नव्हतं की काय करायला हवं, जेव्हा अभिनेता आणि अभिनेत्री सेटच्या मध्येच कुठेतरी भांडतात. त्यानंतर मी माझ्या गाडीत बसले आणि तिथून निघाले. अशा प्रकारे सेटवरून निघून जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. 

हेही वाचा : थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

शीबा आकाशदीप म्हणाली की तिनं निर्मात्यांना हे स्पष्ट केलं की ती चित्रपटाच्या सेटवर परतणार नाही. निर्मात्यांना ती म्हणाली, 'अभिनेत्यानं सगळ्यांसमोर मला चुकीची वागणूक दिली आणि तुम्ही पाहत राहिलात आणि तुम्ही काही केलंच नाही.' शीबानं चित्रपट सोडल्यानंतर सुरक्षा प्रदर्शित झाला होता. आदित्य पंचोलीसोबत या चित्रपटात सुनील शेट्टी, सैफ अली खान, दिव्या दत्त महत्त्वाच्या भूमिकेत होते.