चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत कशी पोहोचणार टीम इंडिया? जिंकावे लागतील एवढे सामने, 1 पराभवही महागात पडेल

Champions Trophy 2025 : भारताला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी सेमी फायनलपर्यंतचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने खेळावे लागतील याबद्दल जाणून घेऊयात. 

पुजा पवार | Updated: Feb 16, 2025, 02:04 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत कशी पोहोचणार टीम इंडिया? जिंकावे लागतील एवढे सामने, 1 पराभवही महागात पडेल   title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy 2025) सुरुवात होणार आहे. तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून 2017 मध्ये उपविजेता ठरलेला भारतीय संघ यंदा विजेतेपदाचा मुख्य दावेदार मानला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवले जातील. यापैकी भारताचे सर्व सामाने हे दुबईत खेळवले जातील. भारताला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी सेमी फायनलपर्यंतचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने खेळावे लागतील याबद्दल जाणून घेऊयात. 

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला अजून एक आयसीसी टूर्नामेंट जिंकण्याची संधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून या संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी पहिला सामना बांगलादेश सोबत खेळेल.  तर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना हा 23 फेब्रुवारी रोजी होईल. तर भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाईल. ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळेल आणि जे दोन संघ ग्रुपमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहतील त्यांना सेमी फायनल खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. यात दोन सेमी फायनल आणि फायनलचा समावेश आहे. 4 आणि 5 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सेमी फायनल सामने खेळवले जाणार आहेत. 

हेही वाचा : रोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral

 

चॅम्पियन्स ट्रॉफी नॉकआउट टूर्नामेंट : 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला नॉकआउट टूर्नामेंट मानलं जात आहे. त्यामुळे इथे एकही सामन्यात पराभूत होणं म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडण्यासारखं आहे. भारताला ग्रुप ए मध्ये असून टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी पहिला सामना बांगलादेश सोबत खेळेल.  तर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना हा 23 फेब्रुवारी रोजी होईल. तर भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाईल. सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील सर्व तीन सामने जिंकणे. कारण यामुळे त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.  पण जर तीन पैकी एकही सामना भारत हरला तर समीकरण बिघडू शकतं. कारण 4 संघांच्या ग्रुपमध्ये 2-2 सामने जिंकलेले दोन संघ असण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सेमी फायनलमध्ये जाणारा संघ निव्वळ रनरेटच्या आधारे ठरवला जाईल.

भारताला कोण देणार तगडी फाईट : 

आयसीसी स्पर्धेत असा अंदाज बांधणं कठीण आहे की कोणता संघ कोणावर भारी पडेल. कारण 2007 वर्ल्ड कप मध्ये भारताला कमजोर समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने पराभूत केलं होतं. 2023 मध्ये पाकिस्तानला अफगाणिस्तानने पराभूत केलं होतं. टीम इंडियासाठी ग्रुप स्टेज सामन्यात बांगलादेशला पराभूत कारण काहीसं सोपं असेल, तसेच पाकिस्तानची टीमला सुद्धा भारत धूळ चारू शकतो. परंतु भारताची मोठी फाईट ही न्यूझीलंड सोबत असेल. जर भारताला बांगलादेश आणि पाकिस्तानला चांगल्या फरकाने हरवणे शक्य झाले तर सेमी फायनलचा रस्ता सुकर होऊ शकेल.