Crime Story: केरळमध्ये नरबळीच्या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. देशातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे. मात्र याच राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडत होती. केरळमधील या घटनेने माणुसकी ओशाळली. केरळमधील या राज्यात दोन महिलांचा बळी दिला गेला होता. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.
केरळच्या तिरुवल्ला नगरजवळील एलनथुर गावातील लोक जेव्हा मंगळवारी सकाळी उठले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात दोन महिलांचा नरबळी देण्यात आला होता. गावातच राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने पैशांच्या हव्यासापोटी दोन महिलांची निर्घृण हत्या केली. इतकंच नव्हे तर, हत्येनंतर मृतदेहाचे 56 तुकडे करण्यात आले. दोन्ही महिलांची छाती कापण्यात आली होती. आरोपींने पीडितेंची हत्या केल्यानंतर पुन्हा तरुण होण्यासाठी शरीराचे काही भागदेखील शिजवून खाल्ले होते. इतकंच नव्हे तर हत्या केल्यानंतर रक्त घरातील भिंतीवर आणि दरवाजावर शिंपडले होते.
या घटनेचे तीन आरोपी आहेत. त्यातील एक डॉक्टर भगावल सिंह, त्याची पत्नी लैला आणि तांत्रिक मोहम्मद शफी अशी आरोपींची नावे आहेत. सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. मागील वर्षीच 11 ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आले आहे.
कोच्चि येथे राहणाऱ्या 52 वर्षीय आर पद्मा आणि कलाडी येथे राहणाऱ्या 53 वर्षांच्या रोजली या आर्थिक संकटाचा सामना करत होते. आरोपी लैला हिने तांत्रिक मोहम्मद शफी यांच्याशी बोलणं केलं होतं. तेव्हा तांत्रिक शफीने लैलाला श्रीमंत व्हायचे असेल तर नरबळी द्यावा लागेल, असं सांगितलं.
लैला हा गुन्हा करायला तयार झाली. पैशांचे लालच दाखवून दोन्ही पीडित महिलेला तांत्रिक एलनथूर गावाला घेऊन गेला. त्यानंतर तंत्र साधना करुन दोन्ही महिलांचा बळी देण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही महिला सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. कोची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैलाने रोजलीची गळा चिरुन हत्या केली. तर शफीने पद्माची चाकू मारून हत्या केली. त्यानंतर दोघांनी महिलांचे मृतदेह जंगलात फेकून दिले. 27 डिसेंबर 2023 रोजी ही घटना घडली होती.
एलमकुलममध्ये राहणाऱ्या लॉटरी विक्रेता आर पद्माच्या कुटुंबाने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर एक व्यक्ती पद्माला तिरुवल्लाला घेऊन गेला होता. तपासात समोर आलं की तो व्यक्ती तांत्रिक शफी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक शफी मनोरोगी आहे. शारिरीक सुख मिळवण्यासाठी तांत्रिकाने हा अपराध केल्याचा अंदाज वर्तवला आहे. तांत्रिकाने श्रीदेवी नावाच्या फेसबुक प्रोफाइलच्या माध्यमातून सिंह आणि लैलासोबत मैत्री केली. त्यानंतर रशीद नावाच्या धर्मगुरु म्हणून त्यांच्याशी संपर्क केला. गेल्या चार वर्षात शफीने डॉक्टर दाम्पत्यावर चांगलाच प्रभाव पाडला होता. त्यामुळं ते त्याची एकूण एक गोष्ट ऐकायचे. मिळालेल्या माहितीनुसार, शफीविरोधात लैंगिक अत्याचार, चोरी आणि हत्यासह वेगवेगळ्या 10 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.