'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी

Jodha Akbar : हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायची जागू पुन्हा एकदा पाहता येणार, मात्र थिएटरमध्ये नाही तर जागतिक स्तरावर 

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2025, 10:52 AM IST
'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी title=
(Photo Credit : Social Media)

Jodha Akbar : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा ‘जोधा अकबर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 17 वर्ष झाली आहेत. तरी सुद्धा या चित्रपटाची प्रेक्षकांवर असलेली क्रेझ संपलेली नाही. तर चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष झाल्यानं या निमित्तानं 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एंड साइंसेज' मार्चमध्ये स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करणार आहे. आशुतोष गोवारिकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जोधा अकबर’ या चित्रपटात मुगल सम्राट अकबर आणि राजपूत राजकुमार जोधाबाई यांच्या लव्ह स्टोरीची आहे. 

2008 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या या दोघांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या दोघांची ऑनस्क्रिन कमेस्ट्री आणि आशुतोष गोवारिकर यांच्या या चित्रपटाला कोणीही विसरलेलं नाही. चित्रपटाविषयी बोलताना आशुतोष गोवारिकर म्हणाले, 'जोधा अकबरला 17 वर्ष पूर्ण होण्यावर मी प्रेक्षकांचा आभारी आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला त्यांच्या आठवणीत ठेवलं त्यावर प्रेम व्यक्त केलं. चित्रपटाचा प्रवास, त्याच्या प्रदर्शनापासून अकादमी पुरस्कारात विशेष स्क्रीनिंगचा सन्मान, त्याचं कारण या चित्रपटात असलेल्या सगळ्यांनी केलेल्या अप्रतिम कामामुळे शक्य झालं. जोधा अकबरला मिळालेल्या प्रेमानं सगळ्यांना उत्साह झाला असणार आणि मी या चित्रपटाला जगभरातून मिळणाऱ्या प्रेमला पाहून खूप आनंदीत झालो आहे.'

हेही वाचा : 'मुलांचे फोटो काढू नका...', सैफच्या हल्ल्यानंतर करीना Alert Mode वर; पापाराझींना दिला इशारा

अकादमीनं नुकताच प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर नीता लुल्ला यांच्या शोमध्ये याच चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या लग्नातील लेहेंगा दाखवला होता. जागतिक प्रेक्षकांवर चित्रपटाचा कायमस्वरूपी प्रभाव साजरा करण्यासाठी मार्चमध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात येईल. 'जोधा अकबर' फक्त त्याच्या भव्य सेटसाठीच नाही तर त्याच्या अप्रतिम अशा सिनेमेटोग्राफी, कॉस्ट्यूम आणि लक्षवेधी अशा साउंडट्रॅकसाठी देखील ओळखला जातो. या चित्रपटात सोनू सूद, रझा मुराद, इला अरुण, निकितिन धीर, सुहासिनी मुळे आणि इतर कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.