Gold Silver Rate : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात विक्मी दर वाढ पहायला मिळत आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रुपये प्रति तोळे तर चांदीच्या दरात 12 हजार रुपये प्रतिकिलो वाढ झाली. सोने प्रति तोळे 90 हजाराच्या जवळपास तर चांदीचे दर प्रति किलो एक लाख रुपयाच्या वर पोहचले आहेत. त्यातच शनिवारी रविवारी अचानक सोनं चांदी स्वस्त झालं. 1100 आणि 2100 रुपयांनी दर कमी झाले आहेत.
जळगाव दोन दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. यांत सोने भाव 1 हजार 100 रुपयांनी कमी होऊन 85 हजार 200 रुपये प्रती तोळ इतका झाला. तसेच चांदीच्याही भावात 2 हजार 100 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीचा दर 96 हजार 200 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. गुरुवार व शुक्रवार सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोने 86 हजार 300, तर चांदी 98 हजार 300 रुपयांवर पोहोचली होती. शनिवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण झाली. सोने 1 हजार 100 रुपयांनी घसरून 85 हजार 200 रुपये प्रतितोळ्यावर आले. तर चांदीही 2 हजार 100 रुपयांनी घसरून 96 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ बद्दल घेतलेल्या निर्णयाचा सुवर्ण बाजारावर परिणाम पहायला मिळाला. लग्नसराई आणि जागतिक ट्रेडवारमुळे सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली. मात्र, सोन्याचे दर किंचीत घरसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने सोनं खरेदी करतात.