1988 Blockbuster Film: सध्या सिनेमांमध्ये किसींग सीन दाखवणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र, किसींग किंवा इंटिमेट सीन शुट करताना अभिनेते किंवा अभिनेत्रींसाठी अवघडल्यासारखे वाटते. कधी कधी तर सीन शूट करताना अनेक चित्र विचित्र किस्से देखील घडतात. असाच एक किस्सा 37 वर्षांपूर्वी एका प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला होता. Kissing सीन शूट करताना अभिनेत्याचा संयम सुटला आणि त्याने अभिनेत्रीचा ओठ चावला. जाणून घेऊया हा किस्सा नेमका काय आहे.
सध्या चित्रपटांमध्ये सर्रासपणे किसींग आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. मात्र, हे सीन शूट करताना अनेक अभिनेते संयम हरवून बसतात. असाच किस्सा 37 वर्षांपूर्वी म्हणजेच 1988 मध्ये दयावान चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला होता. अभिनेते विनोद खन्ना आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांनी माधुरी दीक्षितला 1 कोटी रुपये इतके मोठे मानधन दिले. मात्र, माधुरी दीक्षित लिप लॉक सीन करण्यास नकार देईल असे त्यांना वाटले नव्हते. शेवटी माधुरी किसींग सीन देण्यास तयार झाली.
इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार या चित्रपटात किसींग सीन शूट करताना अभिनेते विनोद खन्ना यांचा संयम सुटला. किसींग सीन खूपच मोठा झाला. रिपोर्ट्सनुसार, लिप-लॉक करताना अभनेत्याने माधुरी दीक्षितचे ओठ चावले होते.
'दयावान' चित्रपटातील 'आज फिर तुम्पे प्यार आया है' हे गाणे खूप गाजले होते. या गाण्यात विनोद आणि माधुरी दीक्षित यांनी खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. इंटिमेट सीन्समुळे या चित्रपटाची आणि स्टारकास्टची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच त्यांच्यावर टीका देखील झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला आणि प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.