अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...

Allu Arjun VS Ram Charan : अल्लू अर्जुन आणि राम चरण या दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण, किती मानधन घेतात हे कलाकार?

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2025, 03:57 PM IST
अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...  title=
(Photo Credit : Social Media)

Allu Arjun VS Ram Charan : तेलगू चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय कलाकार राम चरण आणि अल्लू अर्जुननं वेगवेगळ्या स्टाइल आणि जबरदस्त फॅन फॉलोइंग आणि रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या चित्रपट देत स्वत: चं स्थान निर्माण केलं. लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा राम चरणचे काही चित्रपट आहेत ज्यामुळे त्याच्या लोकप्रियता ही प्रचंड वाढली. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्यापासून नॅशनल अवॉर्डचे पुरस्कार जिंकण्यापर्यंत त्या दोघआंनी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

अल्लू अर्जुन विषयी बोलायचं झालं तर त्याला स्टायलिश स्टार आणि आयकॉन स्टार म्हणून ओळखतात. त्याच्या डान्स स्किल्स, डायनॅमिक स्क्रीन प्रेझेंस आणि फॅशन या सगळ्यां गोष्टींमुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. अल्लू अर्जुनचे 'आर्या', 'अला वैकुंठपुरमुलु' आणि 'पुष्पा' सारख्या हाय एनर्जी चित्रपटांसोबत त्यानं एक वेगळाच ट्रेंडसेट केला आहे. दोन्ही कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलकारांच्या यादीत आहेत. दरम्यान, त्या दोघांच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर राम चरणची नेटवर्थ ही अल्लू अर्जुनच्या नेटवर्थपेक्षा खूप जास्त आहे.

राम चरण विषयी बोलायचं झालं तर त्याची एकूण नेटवर्थ ही 1370 कोटींची आहे. राम चरणची नेटवर्थ ही अल्लू अर्जुनच्या तुलनेत 2.9 टक्क्यांनी जास्त आहे. अल्लू अर्जुनची एकूण नेटवर्थ ही जवळपास 460 कोटी आहे. तर त्याची हैदराबादमध्ये 100 कोटींची एकूण संपत्ती आहे. त्याचे मालक हे अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद आहेत. अल्लू अरविंद हे लोकप्रिय निर्माते आहेत. 

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या मानधनाविषयी बोलायचं झालं तर अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2: द रूल' साठी घेतलेल्या मानधनानं इतिहास रचला आहे. फोर्ब्स इंडियानुसार, त्यानं सीक्वलसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्थात 300 कोटी मानधन घेतलं. त्यामुळे तो भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला होता. संपूर्ण भारतात असलेली त्यांची लोकप्रियता आणि 'पुष्पा: द राइज' ला मिळालेल्या यशानं त्याची मानधनाची रक्कम खूप वाढली आहे. त्यामुळे तो देशात मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक ठरला आहे. 

हेही वाचा : ‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा

या सगळ्यात राम चरणनं कथितपणे 'आरआरआर' या चित्रपटासाठी 45 कोटी मानधन घेतलं आणि सुरुवातीला 'गेम चेंजर' या चित्रपटासाठी 100 कोटी मानधनाची मागणी केली होती. चित्रपटाच्या प्रोडक्शन स्केल आणि मार्केटिंग लक्षात घेता, कथितपणे त्याची मानधनाची रक्कम ही वाढवून 65 कोटी करण्यात आली आहे. राम चरण हा इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आला आहे. दोघांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आणि त्याचे देखील लाखो चाहते आहेत.