ब्राउन की व्हाइट ब्रेड? आरोग्यासाठी काय खाणं चांगलं? जाणून घ्या आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात

Brown Bread Healthy: ब्राउन ब्रेड किंवा व्हाइट ब्रेड आरोग्यासाठी काय चांगले, ब्रेड खावा की नाही? जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 16, 2025, 02:38 PM IST
ब्राउन की व्हाइट ब्रेड? आरोग्यासाठी काय खाणं चांगलं? जाणून घ्या आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात  title=
what is healthier brown bread or white bread dietician

Brown Bread Healthy: तुम्हीदेखील हेल्थ आणि फिटनेससाठी ब्राउन ब्रेड खातात? फक्त तुम्हीच नाही तर अनेकजण हाच विचार करुन व्हाइट ब्रेडच्याऐवजी ब्राउन ब्रेड खाणे जास्त पसंत करतात. मात्र खरंच ब्राउन ब्रेड आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेऊया. 

ब्राउन ब्रेड बनवण्यासाठी गव्हाच्या पीठाचा वापर करण्यात येतो तर व्हाइट ब्रेड बनवण्यासाठी मैदा वापरला जातो. त्यामुळं लोक आपल्या आरोग्यासाठी ब्राउन ब्रेड खातात. कारण कधी तुम्ही विचार केला आहे की, पीठापासून बनवलेल्या ब्रेडचा रंग ब्राउन का असतो हे जाणून घेऊया. 

ब्राउन ब्रेड खरेदी करण्याअगोदर तुम्हीदेखील असाच विचार केला असेल ना की आरोग्यासाठी हा पर्याय चांगला आहे. पण आता एकदा हा विचार कराच. आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दोन प्रकारचे ब्रेड खाल्ले जातात. एक व्हाइट ब्रेड आणि दुसरा ब्राउन ब्रेड, मल्टीग्रेन आणि होलव्हीट ब्रेड . पण व्हाइट ब्रेड पूर्णपणे अनहेल्दी आहे. तर दुसरीकडे होलव्हीट ब्रेड, मल्टीग्रेन आणि ब्राउन ब्रेड हे हेल्दी असल्याचा दावा करतात. 

आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेडचे सेवन करुच नये. कारण मार्केटमध्ये जे ब्रेड आहेत मग ते व्हाइट असो किंवा ब्राउन ब्रेड यात थोड्याफार प्रमाणात मैदा असतोच. त्याचबरोबर यात शुगर आणि रंगदेखील वापरला जातो. इतकंच नव्हे तर ब्रेड बनवण्यासाठी त्यात तेलदेखील वापरले जाते. त्यामुळं ब्रेड हे अनहेल्दी असतात. 

आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, आपल्या घरात बनवण्यात येणारी चपाती ब्राउन रंगाची असते. मग ब्रेड ब्राउन कसा असतो. कार त्यात कॅरेमल रंग वापरण्यात येतो. जो आज कॅन्सरचे एक कारण बनला आहे. त्यामुळं ब्रेड खाण्याआधी एकदा याचा विचार नक्की करा. 

ब्रेडच्या ऐवजी काय खाल?

आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटमध्ये मिळणारे ब्रेड खाण्याऐवजी गव्हाची चपाती किंवा घरातच ब्रेड बनवा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)