Chhaava OTT Release : सगळीकडे आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. खरंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जेव्हा समोर आली तेव्हा पासून हा चित्रपट चर्चेत होता. अखेर 14 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. प्रत्येक ठिकाणी विकी आणि रश्मिकाच्या चर्चा सुरु आहेत. त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाचं आगाऊ बूकिंग एकिकडे अजूनही सुरु आहे. तर दुसरीकडे काही लोक असे आहेत जे हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतीक्षा करत आहेत.
आजकाल अनेक निर्माते त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्या आधीच त्याचे डिजीटल राइट्स हे विकताना दिसतात. मेडॉक चित्रपटाच्या बॅनर अंतर्गत बनवण्यात आलेल्या 'छावा' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर निर्मात्यांनी ओटीटी रिलीज संबंधीत डील डन केली आहे. त्यात ओटीटी प्रदर्शनाचा देखील उल्लेख आहे. जर कोणी थिएटरमध्ये 'छावा' पाहिला असेल तर प्री-क्रेडिट्सला पाहून हे लक्षात आलं असेल की थिएटरनंतर 'छावा' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओटीटी प्रदर्शनाविषयी काही बोलायचं झाल्यास आता इतरक्यात काहीही सांगणं कठीण आहे. कारण चित्रपट प्रदर्शनाला फक्त 2 दिवस झाले आहेत. तर अंदाजे कोणताही चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर जेव्हा बक्कळ कमाई करतो तेव्हा तो चित्रपट कमीत कमी 50-60 दिवस ओटीटीवर प्रदर्शित होतो. त्याप्रमाणे 'छावा' देखील इतक्याच काळानंतर ओटीटीवर प्रदर्शित होऊल.
हेही वाचा : 'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी
दरम्यान, चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगला पाहता याचा सगळ्यांना अंदाज आलाच आहे की छावानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपटाच्या ओपनिंग डेसा 33 कोटी आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 36 कोटींचा गल्ला केला. त्यामुळे दोन दिवसात या चित्रपटानं 70 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. हे आकडे पाहिल्यानंतर आता असं म्हणता येईल की हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणार आहे.