बॉलिवूडचा पहिला 'चॉकलेट बॉय'; 2 अफेअर्स, 4 लग्न; नेमका कोण आहे 'हा' अभिनेता?

बॉलिवूडमध्ये अनेक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा असते. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याविषयी जाणून घेऊया, जो 2 वेळा नातेसंबंधात अडकला आणि ज्याचे 4 लग्न झाले आहेत. 

Updated: Feb 16, 2025, 02:56 PM IST
बॉलिवूडचा पहिला 'चॉकलेट बॉय'; 2 अफेअर्स, 4 लग्न; नेमका कोण आहे 'हा' अभिनेता?  title=

Bollywood Famous Actor: हिंदी चित्रपटसृष्टीत काळ गाजवणारे अनेक दिग्गज कलाकार आहेत. विनोद मेहरा हे त्याच दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. विनोद मेहरा यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्या काळातील बऱ्याच चित्रपटांमधून विनोद यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांवर छाप सोडली होती. त्यांच्या स्टायलिश व्यक्तीमत्त्वामुळेच त्यांना 'चॉकलेट बॉय' असे नाव पडले. या दिग्गज अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र, काही वेगळेच होते. त्यांना त्यांच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आणि वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद मेहराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

विनोद मेहरा यांनी त्यांच्या आयुष्यात तीनदा लग्न केले होते. त्यांनी बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांच्याशी लग्न केल्याची बातमी समोर आली होती. विनोद रेखावर वेड्यासारखं प्रेम करत होते. त्यांचे पहिले लग्न त्यांच्या आईने मीना ब्रोका यांच्याशी लावले होते. 1970 मध्ये विनोद यांचे रेखाशी लग्न झाले, मात्र, लग्नाच्या काही काळानंतर विनोद यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला आणि तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बिघडत गेल्या. 

विनोद मेहरा आणि बिंदिया यांचे नाते

हृदयाविकार या गंभीर आजारातून सावरल्यानंतर विनोद यांची सहकलाकार आणि लोकप्रिय अभिनेत्री  बिंदिया गोस्वामी यांच्याशी त्यांची जवळीक वाढत गेली. विनोद हे आधीच विवाहित असल्यामुळे त्यांनी बिंदियासोबतचे त्यांचे नाते लपवून ठेवले. बिंदियासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल विनोद यांच्या पत्नीला समजताच त्यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

यानंतर, विनोद आणि बिंदिया यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लग्न केले. मात्र, या काळात विनोद यांचा लोकप्रियतेचा आलेख हा कमी होत होता. विनोद मेहरा यांची प्रसिद्धी कमी होत असल्यामुळे बिंदियाशी त्यांचे संबंध बिघडले आणि बिंदिया यांची जे.पी दत्ता यांच्याशी जवळीक वाढली. 

विनोद आणि रेखा यांचे संबंध

त्यानंतर त्या काळात विनोद आणि रेखा यांच्या कथित नात्याच्या अफवा पसरल्या होत्या. रिपोर्टनुसार, विनोद आणि रेखा यांनी जास्त कोणालाही कळू न देता, गुपचूप लग्न केले. मात्र, लग्नानंतर सुद्धा विनोद यांच्या आई रेखाच्या विरोधात होत्या म्हणून रेखा आणि विनोद यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 

विनोद आणि किरण मेहराचे वैवाहिक आयुष्य

यानंतर विनोद किरण मेहरासोबत विवाहबंधनात अडकले. या जोडप्याला रोहन आणि सोनिया अशी दोन मुले आहेत. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू असतानाच विनोद यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.