तुमच्या लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

लोकरीच्या कपड्यांची निगा राखणे जास्त कठीण नाही. योग्य तंत्र आणि थोड्या काळजीने, तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगाम टिकतील, मऊ आणि सुंदर राहतील.

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 16, 2025, 04:14 PM IST
तुमच्या लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स  title=
Photo Credit: Freepik

How to take care of woolen cloth: राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अजूनही  हिवाळा सुरु आहे. थंडीपासून वाचण्यासाठी अजूनही अनेकजण लोकरीचे कपडे घालत आहेत. पण जसं पूर्ण सीजन संपत येईल तसंच लोकरीचा उबदारपणा कमी होईल.  तुमच्या आवडत्या लोकरीचे स्वेटर्स, स्कार्फ आणि ब्लँकेट्सचा उबदारपणा कमी झालेला तुम्हाला कसा चालेल. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या या आवडत्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स. खरं तर या लोकरीच्या कपड्यांची देखभाल करणे एक कौशल्य आहे. पण काळजी करू नका! येथे तुमच्या लोकरी कपड्यांना स्वच्छ, मऊ आणि संपूर्ण हंगामभर उबदार ठेवण्याच्या काही सोप्या टिप्स गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, आर अँड डी, पर्सनल केअर आणि होम केअरचे ग्लोबल हेड, संदीप नाईक यांच्याकडून... 

विशेष काळजी का आवश्यक आहे?

लोकर हे  नैसर्गिक, हवा खेळतं राहणार आणि उबदार असा कापड आहे. मात्र, हे नाजूक सुद्धा तेवढंच आहे. सिंथेटिक फॅब्रिक्सच्या तुलनेत, लोकरीचे धागे उष्णता, तीव्र रसायने आणि रफ हाताळणीने खराब होतात. त्याची चुकीची काळजी घेतल्यास ते आकसणे  किंवा कायमचे खराब होऊ शकते. म्हणूनच योग्य निगा राखण्याच्या पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे.

 सौम्यता हाच उत्तम मार्ग

लोकरीचे कपडे धुण्यासाठी हाताने धुणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. थंड किंवा कोमट पाण्याने बदली भरा आणि सौम्य, लोकरीसाठी विशिष्ट डिटर्जंट वापरा. कपडे हलक्या हाताने पाण्यात घाला, त्यांना कधीही जोरात पिळू नका. 5-10 मिनिटे भिजवून ठेवा आणि त्याच तापमानाच्या स्वच्छ पाण्याने धुवा. जर वेळ कमी असेल, तर मशीन वॉश करा, पण काळजीपूर्वक करा. अत्यंत सौम्य सायकल, थंड पाणी आणि जाळीच्या लॉन्ड्री बॅगचा वापर करा आणि फक्त लोकरी किंवा डेलिकेट सेटिंग निवडा.

डिटर्जंट निवडताना काय लक्षात ठेवावे?

सध्याचे लिक्विड डिटर्जंट्स कपड्यांच्या निगेतील महत्त्वाचे घटक बनले आहेत. लोकरीसाठी खास तयार केलेले डिटर्जंट्स कपड्यांची गुणवत्ता आणि मऊपणा कायम ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, गोदरेज ईझी खास लोकरीच्या कपड्यांसाठी डिझाइन केले गेले आहे, जे मऊ आणि प्रभावी स्वच्छता प्रदान करते. याशिवाय, गोदरेज फॅब आणि जेंटिल सारखी उत्पादनेही नाजूक कपड्यांसाठी उत्तम पर्याय आहेत.

धुणे आणि वाळवण्याची पद्धत

वाळवताना संयम आणि काळजी आवश्यक असते. टंबल ड्रायर टाळा, कारण यामुळे  उष्णतेमुळे लोकरीचे कपडे आकसण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी, जास्तीचे पाणी हलक्या हाताने दाबून काढा आणि कोरड्या, स्वच्छ टॉवेलवर सरळ पसरून ठेवा. कपड्यांचे मूळ स्वरूप परत आणा आणि थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेपासून दूर नैसर्गिकरित्या वाळू द्या.

स्टोरेज टिप्स 

लोकरीच्या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य स्टोरेज महत्त्वाचे आहे. प्रत्येक हंगामाच्या शेवटी कपडे स्वच्छ करून पूर्णपणे सुकवून ठेवा. त्यांना लटकवण्याऐवजी व्यवस्थित दुमडून ठेवा जेणेकरून ते ताणले जाणार नाहीत. तसेच, कपडे थंड, कोरड्या ठिकाणी ठेवा आणि हवेच्या प्रवेशासाठी योग्य असलेल्या बॅग्समध्ये स्टोअर करा. किडे आणि दुर्गंधी टाळण्यासाठी देवदार लाकडाचे ब्लॉक्स किंवा लॅव्हेंडर पाउच ठेवा, जे कपड्यांना ताजेतवाने ठेवण्यास मदत करतील.

लोकरीच्या कपड्यांची निगा राखणे जास्त कठीण नाही. योग्य तंत्र आणि थोड्या काळजीने, तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगाम टिकतील, मऊ आणि सुंदर राहतील.