Success Story: आपल्यापैकी बहुतेकांना कोटक महिंद्रा कंपनीबद्दल माहिती असेल. ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून तिचे मुख्यालय मुंबईत आहे. असे असले तरी आपल्यापैकी बहुतांश जणांना त्याचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह यांच्याबद्दल फार कमी माहिती असेल. 90 च्या शतकाआधी मुंबईत जन्मलेल्या अनेकांचा जन्म, बालपण इथल्या चाळसंस्कृतीत गेले असेल. या चाळीच्या छोट्या पायऱ्यांवर बसून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली. त्यातील काहींनी स्वप्न प्रत्यक्षातही उतरवली. म्हणूनच कधीकाळी 50 रुपये स्टायपेंट मिळवणारा तरुण आज 15 कोटी रुपये इतका पगार घेऊ शकतोय. तसेच 2970000000000 रुपयांच्या कंपनीचा एमडी बनलाय. होय. आपण आज निलेश शाह यांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.
कोटक महिंद्राचे एमडी नीलेश शाह हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्मले होते. मुंबईतील एका चाळीत 210 चौरस फूट खोलीत त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे बालपणही तिथेच गेले. येथेच त्यांनी शिक्षणाची कास धरली, प्रामाणिक राहून प्रयत्न करत राहिले आणि त्यातूनच त्यांचे आजचे व्यक्तिमत्व आकारले गेले. निलेश शाह यांनी 1987 मध्ये सिडेनहॅम कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली आणि 1992 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेतली.
1997 मध्ये ते एका मोठ्या इंजिनीअरिंग कंपनीत नोकरीसाठी रुजू झाले. एकदा कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना फायनान्शियल मार्केटची माहिती दिली. त्यानंतर ते आयसीआयसीआय समूहात सामील झाले आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजमध्ये काम करू लागले. भारतातील सर्वात यशस्वी फंड मॅनेजर बनण्याच्या दिशेने ते त्यांचे पहिले पाऊल होते. निलेश शाह यांनी 1997 ते 2004 पर्यंत फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया एमएफच्या डेट फंडचे नेतृत्व केले. या फंडने त्यांना स्टार फंड मॅनेजर म्हणून ओळख मिळवून दिली.
निलेश शाह 2004 मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमध्ये सामील झाले. या काळात भारतीय मार्केटमध्ये तेजीला सुरुवात झाली होती. डेट फंड भूतकाळातील गोष्ट होती आणि इक्विटी फंड सर्वोच्च स्थानी पोहोचू लागले होते. मार्केटमध्ये महत्वाचे स्थित्यंतर होत असताना महत्त्वाच्या क्षणी निलेश शहा मुख्य गुंतवणूक ऑफिसर बनले. त्यांनी कर्ज आणि इक्विटी फंड दोन्हीवर देखरेख केली. त्यांनी निधी व्यवस्थापक आणि संशोधन विश्लेषकांची एक मजबूत टीम तयार केली.
नीलेश शाहचा प्रवास फारसा सोपा नव्हता. त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. खूप कष्ट करावे लागले आणि संघर्ष करावा लागला. चार्टिंग कोर्सेसमध्ये त्याची अविश्वसनीयता त्याच्या शिक्षणामुळे आहे. चार्टर्ड अकाउंटंट गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी नोव्हेंबर 1991 मध्ये परीक्षेत अव्वल स्थान मिळवले होते.
सुरुवातीला चुकीच्या गुंतवणुकीतून त्यांना अनुभव येत गेला. पण या चुकांमधून त्यांनी धडा घेतला आणि वेगळ्या रणनीतीवर काम केले. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आणि त्यांच्या कर्ज निधीने अखेर इक्विटी फंडांपेक्षा चांगली कामगिरी केली. मे 2006 मध्ये शाह यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफने यूटीआय एएमसीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड हाऊस बनले. हा एक मैलाचा दगड ठरल्याचे निलेश शाह सांगतात.