Latur Accident : मृत्यू कधी कुणाला कसा गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक विचित्र घटना लातुरमध्ये घडली आहे. शांत पणे चहाचे घोट असताना विचित्र अपघात झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
लातूर - मुरुड बायपास महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लातूरच्या दिशेने येणाऱ्या स्कार्पिओ कार संत सावता माळी या चहाच्या हॉटेलमध्ये घुसली. याठिकाणी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले आठ जणांना या स्कार्पिओ कारने उडवले. त्यामध्ये हे 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमींवर मुरुड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुन्या कसारा घाटात नाशिकच्या दिशेनं जाणा-या लेनवर ट्रकचा अपघात झाला आहे. सुदैवानं दुर्घटनेत चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. रविवाचा दिवस असल्यानं आज कसारा घाटात वाहनांची संख्या जास्त असते.. त्यात या दुर्घटनेमुळे कसारा घाटात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईकांनी पोलिसांना सज्जड दम दिला. सेवालाल जयंती शोभायात्रेत एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान ज्या वाहनानं दुचाकीला धडक दिली त्या चालकाला सोडायचं नाही, तसंच हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ब-याचदा अनेक लोक बाईकसह स्टंट करताना दिसतात. आणि काहीवेळा ते धोकादायकही ठरते.दोन दुचाकीस्वार वेगाने स्टंट करताना दिसत आहेत..दुचाकी समोरील एका मोठ्या झाडाला धडकली आणि अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.म्हणूनच असे म्हणतात की असे बाइक स्टंट करताना खूप लक्ष देण्याची गरज आहे.