IND vs PAK Match CT 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमध्ये लवकरच भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील माजी दिग्गज खेळाडूंचं नुकतच एक चर्चासत्र पार पाडलं. या चर्चासत्रामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकबरोबरच, नवज्योत सिंग सिद्धू, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी सहभागी झाले होते. एकमेकांविरुद्ध खेळताना पराभूत झालो तर आमच्या घरचेही आमच्याशी बोलत नाहीत, असा मजेदार खुलासा यावेळेस बोलताना इंजमाम-उल-हकने केला.
भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध 2012-13 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. दोन्ही संघ केवल आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आता आठवड्याभराच्या आत म्हणजेच 23 तारखेला दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत दुबईच्या मैदानावर एकमेकांना भिडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सवरील एका चर्चा सत्रात दोन्हीकडील माजी खेळाडू सहभागी झालेले. त्यावेळेस इंजमाम-उल-हकने एक मजेदार विधान केलं. हे विधान ऐकून सगळेच हसू लागले.
"इंडिया-पाकिस्तानचा सामना असेल आणि तुम्ही पराभूत झालात तर घरचे सुद्धा तुम्हाला फोन करत नाहीत. ते म्हणतात की यांना तिकडेच राहू द्या," असं इंजमाम-उल-हक म्हणताच हशा पिकला.
You know the #GreatestRivalry is heating up when legends from across borders unite on one stage!
is now streaming on JioHotstar & will air on SAT, 15th FEB, at 3 PM on Star Sports 1 and Star Sports 1 Hindi.… pic.twitter.com/R6DzoIXQj1
— Star Sports (@StarSportsIndia) February 15, 2025
पाकिस्तानने 2017 मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळेस अंतिम सामन्यात त्यांनी भारताला पराभूत केलं होतं. पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभारला होता. मोहम्मद आमीर, हसन अली या दोघांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नव्हता.
नक्की वाचा >> मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी; 4.80 कोटींना विकत घेतलेल्या खेळाडूची माघार! आता...
यंदाच्या पर्वात पाकिस्तानचा पाहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 19 फेब्रुवारी रोजी कराचीमध्ये होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारताचे सर्व सामने एकाच मैदानावर होणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेलेले नाही. त्यामुळेच भारताचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत.