धोनीचे शेवटचे IPL...माही निवृत्त होणार? बीसीसीआयच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ

IPL 2025 MS Dhoni CSK: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 17, 2025, 09:59 AM IST
धोनीचे शेवटचे IPL...माही निवृत्त होणार? बीसीसीआयच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ  title=
Photo Credit: @incricketteam/ X

MS Dhoni Retirement: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 25 मे रोजी खेळवला जाईल. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) असा पहिला सामना होणार आहे.  22 मार्च रोजी ईडन गार्डन, कोलकाता येथे स्पर्धेतील पहिला सामना खेळणार जाणार आहे. या सिजनला  13 मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या मैदानात अगदी गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाला यांचाही समावेश आहे. उर्वरित 10 नेहमीची मैदाने आहेत. आयपीएलचे वेळापत्रक समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या पोस्टमधून आयपीएल 2025 चा चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा सीजन कदाचित शेवटचा असेल असे वाटतं आहे. 

बीसीसीआयची पोस्ट काय आहे? 

बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले, “थला चेपॉकमध्ये परत आला आहे! MS धोनीच्या निरोपाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात 23 मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या शानदार सामन्याने होणार आहे. IPL 2025 मध्ये एक अविस्मरणीय अध्याय सुरू होईल - तुम्ही तयार आहात का?" धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारताकडून शेवटचा 2019 मध्ये कॅप्टन कुल खेळला होता. मात्र, त्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळत राहिला आणि त्याने संघाला चॅम्पियन बनवले.

हे ही वाचा: जसा बाप, तसा मुलगा... जुनिअर हार्दिक पंड्याची बॅट फिरवण्याची शैली तुम्ही बघितली का? Video Viral

 

 

हे ही वाचा: कधी सुष्मिता सेन तर कधी अजून कोणी, अखेरीस माजी IPL बॉसला मिळाले नवीन प्रेम; 25 वर्षांपासूनच्या मैत्रिणीला केले प्रपोज

 

गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या शेवटच्या सीझनबद्दल चर्चा होत आहे. असे असूनही तो यंदा वयाच्या 43 व्या वर्षी पुन्हा आयपीएल खेळण्यास सज्ज झाला आहे. यावेळी धोनीला चेन्नई सुपर किंग्जने अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने नियम बदलले होते. यानुसार भारताकडून पाच वर्षे आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या खेळाडूला अनकॅप्ड मानले जाईल. याचा फायदा चेन्नईने घेत धोनीला स्वस्तात रिटेन केले आहे.

हे ही वाचा: 'क्रिकेटपटूंना देव मानणे बंद करा...', टीम इंडियातील सुपरस्टार संस्कृतीवर संतापला 'हा' खेळाडू

 

23 मार्च रोजी चेन्नईचा पहिला सामना

चेन्नई सुपर किंग्ज संघ 23 मार्चच्या संध्याकाळी एमए चिदंबरम स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्याने सिजनची सुरुवात करेल. या दिवशी स्पर्धेतील पहिला डबल हेडर होईल. चेन्नई आणि मुंबईच्या आधी सनरायझर्स आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. धोनी-स्टार सीएसकेचा ग्रुप स्टेजमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याशी दोनदा सामना होणार आहे. एमआय विरुद्ध दुसरा सामना 20 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.