Mohammad Amir Personal Life: ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा 2010 मध्ये एका खेळाडूचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते. या केस अंतर्गत दोषी आढळल्यानंतर 2011 मध्ये त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घातली होती. याशिवाय सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यावेळी जी वकील त्याची केस लढत होती त्याच वकिलाच्या प्रेमात हा क्रिकेटपटू पडला होता. हा क्रिकेटपटू म्हणजे पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर आणि ही लव्हस्टोरी आहे मोहम्मद आमिर आणि नरजीस खातूनची. मोहम्मद आमिरचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते. त्यावेळी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली मोहम्मद आमिरला 2010 ते 2015 पर्यंत बंदीला सामोरे जावे लागले होते. 2010 च्या इंग्लंड दौऱ्यात फिक्सिंग केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर 2011 मध्ये तत्कालीन कर्णधार सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर आयसीसीने 5 वर्षांची बंदी घातली होती. याशिवाय तुरुंगवासही भोगावा लागला होता.
मोहम्मद आमिरचा सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि तत्कालीन कर्णधार सलमान बट यांना 2010 च्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान स्पॉट-फिक्सिंग केल्याबद्दल दोषी आढळला. या प्रकरणी ब्रिटिश न्यायालयाने नोव्हेंबर 2011 मध्ये सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी मोहम्मद आमिरला जवळपास अर्धा वर्ष तुरुंगात राहावे लागले होते. तिथेच मोहम्मद आमिर आणि नरजीस खातून यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
मोहम्मद आमिर आणि नरजीस खातून यांची लव्हस्टोरी खूप रोमँटिक आहे. 2010 मध्ये मोहम्मद आमिरचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते.मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली मोहम्मद आमिरला तुरुंगात जावे लागले. त्यावेळी आमिरचा खटला पाकिस्तान वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेली नरजीस खातून लढत होती.
हे ही वाचा: बालमैत्रिणीच्या प्रेमात क्रिकेटर झाला होता 'आउट'; भुवनेश्वर आणि नुपूरची लवस्टोरी आहे फिल्मी
खटला लढत असतानाच नरजीस खातून आणि मोहम्मद आमिरची जवळीक वाढू लागली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे हे प्रेम एवढे फुलले की मोहम्मद आमिर आणि नरजीस खातून यांचा 2016 साली विवाह झाला. मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्याने आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मोहम्मद आमिरने 2016 मध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.