पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत

Champions Trophy Controversy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी सातत्याने काही वाद निर्माण होत आहेत. कधी स्टेडियम तर कधी यजमानपदावरून वाद होत आहेत.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 17, 2025, 12:14 PM IST
पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत title=

ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्याने काही वाद निर्माण होताना दिसत आहे. कधी स्टेडियम तर कधी यजमानपदावरून वाद होताना दिसून येत आहे. आता ताजा वाद हा भारताच्या झेंड्यावरून झाला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या इतर देशांचे झेंडे तिथे दिसत आहेत, पण भारतीय ध्वज तिथून गायब होता. यामुळे सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय भारतीय चाहते यावरून चांगलेच संतापलेले दिसत आहेत. 

कारण अद्याप कळू शकले नाही

कार्यक्रम सुरू होण्याच्या काही दिवस आधी, मैदानावरून एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये सहभागी देशांचे ध्वज पाहिले जाऊ शकतात, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) असे का केले. भारतीय ध्वज नसण्यामागचे नेमके कारण अजून कळू शकलेले नाही. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळत असल्याच्या वस्तुस्थितीशी याचा काही संबंध असू शकतो अशी चर्चा होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय टीम पाकिस्तानला जाणार नाहीये. जर टीम इंडिया सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तरी त्याचे सामने दुबईतच होतील.

हे ही वाचा: 'हा' क्रिकेटर तुरुंगात भोगत होता शिक्षा, खटला लढणाऱ्या वकिलावरच जडला जीव; जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी

 

 

 

हे ही वाचा: 3 तास 44 मिनिटांचा 'हा' चित्रपट करतोय 14 देशांमध्ये ट्रेंड; 1800 कोटींची केलीये कमाई

 

'या' देशांचे सामने होणार कराचीमध्ये 

कराची स्टेडियमवर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचे सामने होणार आहेत. 

हे ही वाचा: धोनीचे शेवटचे IPL...माही निवृत्त होणार? बीसीसीआयच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ

बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात करार

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये बदलावी लागली. BCCI, PCB आणि ICC यांच्यात एक करार झाला, ज्या अंतर्गत पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या काही वर्षात भारत-यजमान आयसीसी स्पर्धांमध्ये आपले सामने खेळणार नाही.