नॉस्रेदमस आणि बाबा वेंगाने भूकंपासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये? 2025 वर्ष अतिशय धोक्याचं

Baba Vanga Nostradamus On Earthquakes: दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर भूकंपाबद्दलची भविष्यवाणी चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 17, 2025, 12:16 PM IST
नॉस्रेदमस आणि बाबा वेंगाने भूकंपासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये? 2025 वर्ष अतिशय धोक्याचं title=
दोघांनी काय म्हटलंय भविष्यवाणीत पाहा

Baba Vanga Nostradamus On Earthquakes: मानवाला न उलगडलेल्या कोड्यांमध्ये भूकंपाचाही समावेश होतो. खरं तर भूकंप कधी आणि कुठे येणार याची भविष्यवाणी करणं हे वैज्ञानिकांना जमलेलं नाही. भूकंप कधी, कुठे येणार? त्याची तिव्रता किती असणार? या साऱ्या गोष्टी आजही कोणाला अचूकपणे सांगता येत नाही. दिल्लीमध्येही अशाचप्रकारे आज अनपेक्षितपणे भूकंपाचा धक्का बसला. अनेकजण घराबाहेर पळाले तर अनेकांची भितीने गाळण उडाली. मात्र ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही भूकंपामुळे असे प्रकार घडले आहेत. भविष्यवाणीबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा दोन नावं आवर्जून घेतली जातात ती म्हणजे, नॉस्रेदमस आणि बाबा वेंगा! योगायोग म्हणा किंवा इतर काही पण या दोघांच्या भविष्यवाणी अनेकदा बरोबर आल्या आहेत. त्यांनी भूकंपासंदर्भात काय भविष्यवाणी केलीय पाहूयात...

नॉस्रेदमस कवितांमधून दिले संकेत

नॉस्रेदमसने आपल्या कवितांमध्ये अनेकदा नैसर्गिक आपत्तींसंदर्भात भाष्य केलं आहे. जमीन हलणे आणि नद्यांना पूर येणं यासारख्या गोष्टींचा संदर्भ पर्यावरणासंदर्भात आपत्ती येण्याशी जोडला जातो. 2025 हे वर्ष ग्लोबल वॉर्मिंगचं मानलं जात आहे. समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ, बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढणे आणि वातावरणात होणारे बदल या गोष्टींबद्दल वैज्ञानिकांनी आधीच इशारा दिला आहे. वणवे, दुष्काळ, पूर संकट यासारख्या गोष्टींबद्दल नॉस्रेदमस यांनी आपल्या पुस्तकात संदर्भ दिला आहे. अचानक भूकंप येणे किंवा कमी वेळात भरपूर पाऊस पडल्याने पूर येणे किंवा उष्णतेचे प्रमाण वाढणे हे सारे नैसर्गिक आपत्तीचे संदेश आहेत. नॉस्रेदमसने नेमकं काय म्हटलंय 2025 बद्दल पाहूयात...

> सन 2025 जगभरात भू-राजकीय तनाव निर्माण होईल. 
> सुदानमध्ये दुष्काळ पडेल. या देशाला कमी प्रमाणात मदत मिळेल आणि त्यामुळे येथून बरेच नागरीत विस्थापित होतील.
> सीरियामध्ये बशर अल-असद यांच्या सत्तेनंतर बराच काळ संघर्ष सुरु राहील.
> जगातील सर्वात शक्तीशाली लोकशाहीमध्ये म्हणजेच अमेरिकेत दुसऱ्यांदा ट्रम्प यांची सत्ता येईल

बाबा वेंगाची भविष्यवाणी काय?

बाबा वेंगाने सन 2025 संदर्भात काही भविष्यवाणी केल्या आहेत. या भविष्यवाण्यांची सध्या चर्चा आहे. या भविष्यवाणीनुसार, युरोपमध्ये एक मोठं युद्ध सुरु होणार आहे. या युद्धामुळे मोठ्याप्रमाणात जिवितहानी होणार आहे. 2025 सालच्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीप्रमाणे रशिया संपूर्ण जगावर राज्य करेल. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा विचार केल्यास ही शक्यता अगदीच धूरस वाटत आहे. 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तींसंदर्भातील भविष्यवाणी करण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भूकंप येईल आणि अनेक निष्क्रिय ज्वालामुखी सक्रीय होतील. म्हणजेच भूगर्भामध्ये मोठ्या हलचाली होतील आणि मागील अनेक शतकांपासून शांत असलेले ज्वालामुखी पुन्हा सक्रीय होतील.