कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : शिर्डीतील साईबाबा मंदिर संस्थानला दरवर्षी, जर दिवशी मोठ्या संख्येनं भाविक भेट देतात. वर्षागणिक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे अशा या शिर्डीमध्ये आता भाविकांसमवेत फसवेगिरी करणाऱ्यांचाही सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Shirdi Saibaba)
नुकत्याच समोर समोर आलेल्या वृत्तानुसार साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंग्डम अर्थात युकेमधील (UK) भाविकांची शिर्डीत फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. ज्यामुळं साईंच्या शिर्डीत भाविकांची लुट थांबेना असंच म्हणावं लागत आहे.
साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंग्डम मधील भाविकांची शिर्डीत फसवणूक झाली असून, मंदिरात दिल्या जाणाऱ्या पुजा साहीत्याच्या माध्यमातून भाविकाला फसवण्यात आलं. पुजा साहित्यांच्या नावाखाली भाविकांची चार हजार रुपयांची फसवणूक करत त्यांना पाचशे रुपयांचं सामान तब्बल 4000 रुपयांना विकण्यात आलं आहे.
बलदेव राममेन असं युके मधील फसवणूक झालेल्या या भाविकाचं नाव. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फुलभांडार दुकानावर कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. हा झाला एक प्रसंग. पण, इथं कमिशन ऐजंट आणि पॉलिसी करणाऱ्यांकडून दररोज भाविकांची फसवणूक होत असून, वरील प्रकरणात युकेतील साईभक्ताच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी प्रदीप त्रिभुवन, सूरज नरोडे या दोघांना शिर्डी पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं असून, दुकान मालक आणि जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांची फसवणूक केल्याबाबत शिर्डी पोलिसांत भाविकांच्या फिर्यादीवरून फसवणुकिचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी माध्यमांना दिली.