मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीनं तिच्या फॅशनने भल्याभल्यांचे होश उडवले. उर्फीचा नवा आउटफिटपाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. यावेळी उर्फीनं चक्क सिमकार्डपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमुळे उर्फीच्या घरी पोलिसांनी हजेरी लावली आहे. (Urfi Javed Sim Card Dress)
उर्फीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. उर्फीनं हा व्हिडीओ नेटफ्लिक्ससोबत केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. नेटफ्लिक्सच्या सीरिज 'जमतारा 2' (Jamtara 2)' चे डिझायनर तिला सिमकार्डनं बनवलेलं ड्रेस विकून लाखो रुपयांची फसवणूक करतात. (Urfi Javed Viral Video)
सुमारे 2 हजार सिम कार्डपासून हा ड्रेस बनवला आहे. या ड्रेससाठी उर्फी चक्क 5 लाख 20 हजार रुपये खर्च करते. उर्फी हा नवीन ड्रेस परिधान करत जेव्हा फोटो काढत असते तेव्हा पोलिस तिच्या घरी येतात. त्यावेळी पोलिस उर्फीला सांगतात की हे सगळे सिम कार्ड स्कॅम घोटाळ्यातले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी कॅप्शन देते की 'ब्रेकिंग न्यूज, उर्फी जावेदसोबत फसवणूक झाली. आता सगळ्यांचा नंबर येईल.' (Urfi Javed Sim Cards Outfit Video Goes Viral Police Show Up At Her Place)
सोशल मीडियावर उर्फी नेहमीच त्याच्या लूक आणि फॅशन क्रिएटिव्हिटीमुळे चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्सलाही अनेकदा ट्रोल करण्यात येतं, पण उर्फी ट्रोल करणाऱ्यांकडे फारसं लक्ष देत नाही आणि नवीन आयड्यासोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. (Urfi Javed Fashion)