Urvashi Rautela : उर्वशी रौतेला ही अभिनेत्री कायमच चर्चेत असते. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. तिचा श्रीमंतीचा थाट पाहूनही अनेकांना तिच्यासारखंच राहावंसं वाटतं. परंतु तुम्हाला माहितीये का की उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते ती म्हणजे तिच्या मानधनासाठी. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार उर्वशी रौतेला ही एका मिनिटासाठी तब्बल 1 कोटी रूपये घेते, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात उर्वशीच्या मानधनाबद्दल जोरात चर्चा रंगलेली आहे.
मध्यंतरी उर्वशीनं कान्स चित्रपट महोत्सवात मगरीचा हिऱ्यांचा नेकलेस घातला होता. त्यामुळे तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तिची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातूनही तिनं आपल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही चांगलेच भाष्य केले होते. यावेळी तिच्या या नेकलेसची किंमतही 200 कोटी रूपयांच्या आसपास होती. तिच्या या श्रीमंत थाटाचा बोलबोला सर्वत्र असतो. त्यातून ती मिस दिवा, मिस युनिव्हर्सही आहे. त्यामुळे 1 मिनिटासाठी ती एक कोटी रूपये हे घेणारच.
एका रिडिटच्या युझरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात उर्वशी आपल्या प्रवासाबद्दल एका रिपोर्टरशी बोलते आहे. तेव्हा त्या रिपोर्टरनुसार, उर्वशी ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याचे समोर आले. ती 1 मिनिटासाठी 1 कोटी रूपये घेते. तेव्हा तीसुद्धा हे कबूल करते आणि म्हणते की सर्व मेहनत करणारे कलाकारही माझ्याएवढे यशस्वी व्हावेत. उर्वशीनं 2015 साली मिस दिवा आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा जिंकल्या आहेत. उर्वशीची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. तिच्या महागड्या कपड्यांपासून ते तिच्या जगभ्रमंतीपर्यंत सगळ्याचीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी तिच्या आयफेल टॉवरच्या फोटोचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यामुळे तिचा श्रीमंत थाट हा कायमच चर्चेत असतो.
उर्वशीनं अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांतूनही कामं केली आहेत आणि सोबतच तिची सतत चर्चाही होताना दिसते. तिचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोवर्स आहेत. त्यातून आपलं नवं नवीन फोटोशूटही ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. यावेळी मानधनाच्या बाबतीत तिनं प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादूकोणलाही मागे सोडलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तिच्या या व्हिडीओखाली अनेक जण नानविध कमेंट्सही करताना दिसत आहेत. उर्वशी आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. तेव्हा तिचा कोणता लुक तुम्हाला आवडतो?