Vikram Gokhale Health update : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale ) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. गोखले यांच्या अवयवांची सैम्य हलचाल होत असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 48 तासात त्यांना व्हेंटिलेटरवरुन देखील काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल माहिती
अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत आणि हात-पाय हलवत आहेत. पुढील 48 तासांत त्यांचं व्हेंटिलेटर सपोर्ट निघू शकेल. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे. अशी माहिती दीनानाथ रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale ) यांच्या निधनाच्या अफवा उठलेल्या असताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या साऱ्याला पूर्णविराम दिला.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे गोखलेंच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देणारं Health Bulletine जारी करण्यात आलं त्यातून ही माहिती समोर आली. सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काय म्हणाले डॉक्टर आणि निकटवर्तीय?
'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. गेल्या 24 तासांपासून ते जगण्यासाठी झुंज देत आहेत. त्यांच्या शरीरातील विविध अवयव निकामी झाले असून, सध्या डॉक्टांची टीम त्यांच्या परीनं शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत', असं गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पण आता गोखले यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.