मुंबई : अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहचलेले डासिंग स्टार डब्बू अंकल आता टेलिव्हिजनवरही झळकणार आहेत. डब्बू अंकल यांचे नेटकरी जितके चाहते आहेत तितकीच त्यांची क्रेझ बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही आहे. नुकतेच मध्यप्रदेश विदिशा येथील डब्बू अंकल यांनी सलमान खानच्या 'दस का दम' या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. अभिनेता मिथून आणि गोविंदा यांच्या स्टाईलमध्ये डब्बू अंकल थिरकतात.
सलमान खानचा दस का दम हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनवर सुरू करण्यात आला आहे. यामध्ये डब्बू अंकल यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. नुकताच याचा एक प्रोमो फेसबूकच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे. डब्बू अंकलचा डान्स आणि प्रेक्षकांना फ्लाईंग किस देण्याचा प्रयत्न पाहून सलमान खानलाही त्याचं हसू आवरणं कठीण झालं आहे.
46 वर्षीय डब्बू अंकल हे व्यावसायाने प्राध्यापक आहेत. मात्र सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र नुकतीच त्यांना एक कर्मिअल अॅडमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली आहे.