व्हिडिओ : तेरी मेरी यारी... आता येतोय 'दोस्तीगिरी'!

 हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे

Updated: Aug 22, 2018, 08:38 AM IST

मुंबई : तुम्ही आयुष्यभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मित्र जोडत गेला असाल तरी कदाचित शाळा - कॉलेजमधल्या मित्रांसारखी मैत्री मात्र आयुष्यभर मिळणार नाही. कारण ही मैत्री असते निस्वार्थ... निरागस... निखळ... कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. अशाच एका सुंदर नात्याचा प्रवास म्हणजे 'दोस्तीगिरी'...

या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय विजय शिंदे यांनी... तर संकेत पाठक, राहुल राज डोंगरे, पूजा मळेकर, विजय गीते, पूजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

'सिनेमाचे निर्माते कैलासवासी संतोष पानकर ह्यांनी हा सिनेमा घेऊन यायचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी पाहिले होते. पण दूर्देवाने त्यांचा एक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला... त्यांचं स्वप्न आता पूर्ण होतंय' असं चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे यांनी म्हटलंय.