Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणात गॅंगस्टर गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोई असल्याच समोर आले आहे. सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली आहे. तर त्यात दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा हा विशाल राहुल उर्फ कालूला भेटतोय. जो याच गॅन्गचा शूटर आहे. त्यामुळे असा संशय आहे की गोळी त्यानंच झाडली असेल.
कालू लॉरेन्स बिश्नोई गॅंगमधील आहे आणि एक बुकीची हत्या केल्यामुळे चर्चेत आला होता. त्यामुळे आजतकनं कालूच्या बहिणीशी संपर्क साधला ज्यात त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. कालूच्या बहिणीनं सांगितलं की फेब्रुवारी महिन्यापासून तिचा भाऊ घरातून गायब आहे आणि त्याच्याशी तिचा कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकलेला नाही. ती तिच्या भावाविषयी चिंतेत आहे. कालूच्या बहिणीनं सांगितलं की 7 मार्च पासूनच पोलिस तिच्या घरी येत जात आहेत आणि कालूविषयी सतत विचारत आहेत. तर 29 फेब्रुवारी रोजी क्रिकेट बूकी सचिन गौदाची रोहतकमध्ये हत्या झाली होती, तेव्हा पासून कालू हा घरातून गायब आहे.
कालूनं 10 वी पर्यंत शिक्षण केलं आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. कालू त्याच्या तीन भावंडांमध्ये सगळ्यात छोटा आहे. कालूच्या बहिणीप्रमाणे एक दिवस आधी दिल्ली पोलिस आणि एसटीएफची टीम आली होती आणि एनकाऊंटर करण्याची धमकी देऊन गेली होती. इतकंच नाही तर पोलिसांनी तिलाही पकडण्याची धमकी दिली आहे. कालूच्या विरोधात 5 पेक्षा जास्त गुन्हेगारीचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. त्यात फायरिंग आणि बाइक चोरी सारखे काही आरोप आहेत. माहितीनुसार, विशाल विरोधात गुरुग्रामसोबत दिल्लीत देखील त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विशालनं हरियाणाच्या रोहतकमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावर बुकीची हत्या केली होती. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंगमध्ये तो गोळी झाडताना दिसला. विशाल, राजस्थाच्या कुख्यात गॅंगस्टर रोहित गोदाराचा शूटर आहे.
हेही वाचा : काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांनी त्यांची बाईक वांद्रे परिसरातच सोडली. सलमान खानच्या घरावर गोळीबाराची योजना अमेरिकेत तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्यांना व्हर्च्युअल नंबरवरून कामाची माहिती देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर अमेरिकेतल्या रोहित गोदाराच्या सांगण्यावरून हल्लेखोरांसाठी शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की क्राइम ब्रांचनं नवी मुंबईतून दोन संशयितांना अटक केली आहे आणि सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.