मुंबई : अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' 1969 मध्ये रिलीज झाला. पण त्यानंतर लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द त्यांची चांगली चालली नव्हती. तेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. आता या बातमीत इंदिरा गांधींचा उल्लेख का केला गेला? कारण अमिताभ यांची आई तेजी बच्चन आणि इंदिरा या दोघीही खास मैत्रिणी होत्या. अमिताभ यांच्या कठिण परिस्थितीत राजीव गांधी अमिताभ यांची चित्रपट कारकीर्द सांभाळण्यासाठी पुढे आले.
राजीव आणि अमिताभ हे लहानपणीचे मित्र होते. राजीव आणि अमिताभ दोघेही कॉमेडियन मेहमूद यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्या काळात महमूद 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटाचं कास्टिंग करत होते.
हनीफ झवेरी यांच्या 'अ मॅन ऑफ मेनी मूड्स' या पुस्तकानुसार मेहमूद यांना ड्रग्स घेण्याचं व्यसन होतं. या ड्रग्सचं नाव होतं 'कॉम्पोज'. हि टॅबलेट महमूद भरपूर प्रमाणात सेवन करीत असंत. राजीव आणि अमिताभ जेव्हा त्यांना भेटायला पोहोचले. ''
तेव्हा महमूद यांचा छोटा भाऊ अनवर या दोघांची ओळख करुन देत होता. पण त्यावेळी महमूद यांना काय बोलावं हे कळंत नव्हतं. महमूद यांनी पाच हजार रुपये काढून अनवरला दिले. हे पैसे अमिताभ यांच्या मित्राला देण्यास सांगितलं. अनवर जरा अस्वस्थ झाला. त्याने पैशाचं कारण विचारलं.
महमूद म्हणाले, "हा मुलगा अमिताभपेक्षा सुंदर आणि स्मार्ट आहे. हा पुढे जावून इंटरनॅशनल स्टार बनेल. त्याला पैसे द्या आणि साईन करा. हा मुलगा माझ्या पुढच्या चित्रपटात काम करेल."
अनवर यांना समजलं की, नशेत महमूद राजीवला ओळखू शकत नाही. अनवर यांनी पुन्हा महमूद यांना सांगितलं की ते राजीव आहेत. ते पंतप्रधान इंदिरा गांधीं यांचा मुलगा आहे. यानंतर महमूदला थोडीशी जाग आली. यानंतर सगळेजण एकमेकांशी आपआपसांत चर्चा करु लागले. आणि अमिताभ यांना 'बॉम्बे टू गोवा' हा चित्रपट मिळाला. यानंतर अमिताभ यांचं डगमगीत चित्रपट कारकिर्दीने पुन्हा जोर धरला.
एकदा याबद्दल बोलतांना अमिताभ म्हणाले होते की, महमूद बरोबर बोलले होते. राजीव एक इंटरनॅशनल स्टार आहे. पण सिल्वर स्क्रिनवर नाही तर राजकारणाच्या क्षेत्रात हा किस्सा रशीद किदवई यांच्या '24 अकबर रोड' या पुस्तकात लिहीला आहे, हे पुस्तक 'हॅचेट पब्लिकेशन'ने प्रकाशित केले आहे.