मुंबई : फिल्ममेकर रामगोपाल वर्मा यांनी युरोपमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत एक व्हिडिओ शूट केला आहे.
या व्हिडिओसोबत एक शिर्षक देखील शेअर केलं आहे, गॉड सेक्स एंड ट्रूथ. तसेच मालकोवाने गुरूवारी ट्विटरवर भारतीय फिल्ममेकरसोबत काम करणार असल्याचं उत्साहात म्हटलं.
तिने ट्विटरवर म्हटंल आहे की, भारतीय फिल्ममेकर रामगोपाल वर्माने माझ्यासोबत युरोपमध्ये एक व्हिडिओ शूट केला. गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ असं या व्हिडिओला नावं दिलं आहे. मी सनी लिओनी नंतर भारतीय फिल्म दिग्दर्शकसोबत काम करणारी दुसरी अडल्ट स्टार आहे. तसेच तिने यासाठी रामगोपाल वर्माला धन्यवाद देखील म्हटलं आहे.
राम गोपाल वर्माने आपल्या या ट्विटमध्ये मियासोबत गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूख अशी शानदार कॅप्शन देऊन मियासोबतचा अनुभव छान होता. असं देखील म्हटलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की, मला कधी सनी लिओनीसोबतकाम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र मी गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ या शुटिंगच्या अनुभवाला कधीच विसरू शकत नाही.
#GodSexTruth is about a revolutionary sexual philosophy as professed by @MiaMalkova and encapsulated by me ..it’s about telling the Truth behind Sex as intended By God pic.twitter.com/N4j1JzkSP1
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 11, 2018
मिया मल्कोवाबद्दल बोलायचं झालं तर तिचा जन्म 1 जुलै 1992 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील पाम स्प्रिंग्समध्ये झाला. मिया मल्कोवाने 2012 मध्ये अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे. तिने हार्ड कोअर जगात आपल्यासाठी जागा निर्माण केली आहे.
अॅडल्ट कंटेंट असलेली ही रामगोपाल वर्माची दुसरी निर्मिती आहे. रामूने गन्स अॅण्ड थाईज ही वेब सिरिज देखील आपल्या बोल्ड कंटेंटमुळे भरपूर व्हायरल झाली होती. 16 जानेवारी रोजी गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ हा सिनेमा रिलिज होत आहे.