Ye Hai Mohobattein: आजपर्यंत अनेक हिंदी मालिकांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आत्तापर्यंत अनेक मालिका (Television Serials) आल्या आणि गेल्या पण प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडून गेल्या. त्यातील अनेक कलाकारांनाही आपल्या अभिनयाची छापही प्रेक्षकांवर सोडली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री आहे ती म्हणजे रूहानिका धवन (Ruhika Dhawan). दहा वर्षांपुर्वी 'ये हे मोहोब्बतें' (Ye Hai Mohobattein) या मालिकेतून बालकलाकार (Child Artist) म्हणून लहान वयातच टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. रूही त्यावेळी खूप लहान होती परंतु आता ती मोठी झाली असून तिचा लुकही पुरता बदलला आहे. (ye hai mohobattein ruhanika dhawan looks different see her new photo on instagram)
'ये है मोहब्बते' फेम रुहानिका धवनने (Ruhi in Ye Hai Mohobattein) रुहीची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या क्यूटनेसनं तिनं तिच्या चाहत्यांची मने जिंकली. रुहानिका आता बरीच मोठी झाली आहे. ती तिच्या फॅशन सेन्सपासून ते स्किन केअरकडे आता खूप लक्ष देतं आहे. तिची त्वचाही छान चमकते आहे. या त्वचेला उजळवण्यासाठी तिनं स्पेशल थेरपी (Skin Therpy Price in India) करून घेतली आहे.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रुहानिका धवन सोशल मीडियावरच (Social Media) खूप सक्रिय नाही तर तिचे चाहतेही तिच्यावर खूप प्रेम करतात. रुहानिका चाहत्यांसाठी सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स देत असते. काही काळापूर्वी रुहानिकाने तिच्या एका खास स्किन ट्रीटमेंटची माहिती दिली होती. रुहानिकाने लेझर हेअर रिमूव्हल थेरपी घेतली आहे.
'ये है मोहब्बते' या मालिकेतून पदार्पण केल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओठांच्यावरील केस दिसत होते आता नव्यानं ट्रीटमेंट केल्यानं तिच्या चेहऱ्यावरील केस कमी झाल्याचं दिसतं आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
'ये है मोहब्बते' फेम रुहानिका हिने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी लेझर ट्रीटमेंटचा अवलंब केला आहे. या तंत्राबद्दल लोकांमध्ये अनेक समज आहेत. एखाद्या प्रस्थापित अभिनेत्रीला या उपचाराने चमकणारा चेहरा मिळवता आला तर या गैरसमजांना आपोआपच विराम मिळतो. हेअर रिमूव्हल थेरपीच्या अनेक प्रक्रिया आहेत परंतु रुहानिकाने घेतलेल्या उपचारांमुळे चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ कमी होते.