Actress Anchal Singh Without Work : अनेकांच स्वप्न असतं की अभिनय क्षेत्रात जाऊन एक लोकप्रिय कलाकार व्हायचे. त्यात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच नशीब आजमावतात. बऱ्याचवेळा त्यांना कामही मिळतं. पण चांगला अभियन येत असूनही त्यांना पडद्यापासून लांब रहावे लागते. इतकंच काय तर ते महिनोंमहिने बेरोजगार राहतात. त्यामुळे कलाकारांना मोठा धक्का बसतो. असे बऱ्याच कलाकारांसोबत झाले आहे. त्यापैकी एक अभिनेत्री आंचल सिंग (Anchal Singh) आहे. आंचलनं तिचा हा अनुभव सांगितला आहे. इंडस्ट्रीला इतकी वर्षे देऊनही आज ती घरी असून बेरोजगार असल्याच तिनं सांगितले आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंचलही हे खंत सांगितली आहे. मात्र, हा वेळ ती आपल्या कुटुंबासोबत राहून साजरा करत आहे. पण काम न मिळाल्याने तिला याचे दु:खीही आहे.
आंचल सिंगनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी आंचल म्हणाली, तिला इंडस्ट्रीत येऊन 12 वर्षे झाली आहेत. या काळात तिनं बरीच कामं केली आहेत. पण तिनं दोन जबरदस्त हिट वेब सिरीजही दिल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले 'ये काली काली आँखे' आणि 'अनदेखी' या वेबसीरिज सुपरहिट ठरले होते. या वेबसीरिजचे लोकांनी खूप कौतुक केले. एवढंच नाही तर त्यांच्या पुढच्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. मात्र, असे असतानाही ती 6 महिन्यांपासून बेरोजगार असल्याने त्यांना काम मिळत नाही. इतकंच नाही तर उत्कृष्ट काम करूनही आंचल सिंगला कोणत्याही श्रेणीत अवॉर्ड मिळालेला नाही.
यावर पुढे आंचल म्हणाली, लोक तिला प्रश्न विचारत आहेत की ती नवीन वर्षात कोणते काम करणार आहे, परंतु सत्य हे आहे की फक्त दोन वेब सीरिज व्यतिरिक्त, तिला कोणत्याही ऑडिशनसाठी बोलावण्यात आले नाही आणि कधी कोणी तिला कामसाठी विचारले नाही. समोरून विचारूनही कोणीतिला काम दिले नाही. याशिवाय लोक तिला फक्त इतकंच विचारतात की तिला काम का मिळत नाही.
हेही वाचा : हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी
आंचल शेअर केलेल्या त्या पोस्टनुसार तिला काम मिळत नाही आणि नॉमिनेशनही तिच्या हातात नाही, त्यामुळे वर्ष अखेरीस ती कामाशिवाय घरी बसली आहे. मात्र, सकारात्मक बाब म्हणजे आंचल अतिशय शांततेत काम करत आहे आणि ही पोस्ट शेअर करण्याचे कारण म्हणजे टॅलेंट असूनही लोक कामासाठी कसे तळमळतात हे सांगण्यासाठी तिनं पोस्ट शेअर केली आहे.