Zee Real Heroes Award : बॉलिवूड गायक कुमार सानू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

देशातील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांना झी रिअल हीरोज अवॉर्ड्स 2024 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 15, 2025, 05:03 PM IST
Zee Real Heroes Award : बॉलिवूड गायक कुमार सानू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित title=

देशातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांना झी रिअल हीरोज अवॉर्ड 2024 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम १४ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. झी रिअल हीरोज अवॉर्ड्स २०२४ हे भारतातील सर्वात खास प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जे वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना सन्मानित करते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजय देवगण, कार्तिक आर्यन, अनुपम खेर आणि अमोघा लिलादास यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

कुमार सानूचा मधुर आवाज पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुमार सानू यांना 2009 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.

एकाच दिवशी सर्वाधिक गाणे केले रेकॉर्ड 

1993 मध्ये कुमार सानू एका दिवशी सर्वाधिक गाणे रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला आहे. यामुळे त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तसेच त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. कुमार सानू यांचा आवाज कायमच लोकांसाठी खास असतात. त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली आहे. 

प्रेक्षकांच्या पसंतीला पडली ही गाणी 

कुमार सानू यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये "एक लडकी को देखा", "चुरा के दिल मेरा", "तुझे देखा तो ये जाना सनम", "मेरी मेहबूबा", "तू मिले दिल खिले", "चांद सितारे" आणि "बाजीगर ओ बाजीगर" अशी अनेक गाणी आहेत. ”, जे लोकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत.