प्रसाद लिमये : ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे अगदी सोप्या आणि सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेच सांगायचं झाल्यास आपण याला "पृथ्वीला आलेला ताप" असं म्हणू शकतो. म्हणजेच पृथ्वीचे तापमान हळू-हळू वाढू लागले आहे. अगदी पूर्वी पृथ्वीवर तसं वातावरण (Atmosphere) नव्हतंच. म्हणूनच पृथ्वी दिवसा गरम आणि रात्री थंड असायची.
तेव्हा पृथ्वीतलावर जीवनच नव्हतं. पण जेव्हा पृथ्वीवर वातावरण निर्माण झालं तेव्हा दोन गोष्टी झाल्या. १) वातावरण निर्मितीमुळे सुर्याच्या हानिकारक किरणांना थांबवून दिवसाचं तापमान नियंत्रणात आलं. २) दुसरं म्हणजे रात्री सुर्याच्या अनुपस्थितीत रात्रीचं तापमान नियंक्षणात ठेवलं गेलं. म्हणजेच जास्त थंड होण्यापासून रोखलं. अशाप्रकारे लाखो-करोडो वर्षांनंतर पृथ्वी त्या तापमाना दरम्यान आली जिथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकते...
ज्यामुळे पृथ्वीचे तापमान जीवसृष्टीसाठी जीवसृष्टीसाठी उपयुक्त ठरले. त्याला 'Green House Effect' म्हणतात आणि ढोबळ मानाने बघितलं तर "Green House Effect" साठी Co2 आणि Methene हे महत्वाचे घटक आहेत आणि जरा नीट बघीतलं तर औद्योगिक क्रांतीपर्यंत सर्व व्यवस्थितपणे चाललं होतं... पण, त्यानंतर विज्ञानाने एवढा विकास केला की पृथ्वीचं तापमान 1.1 डिग्री सेल्सियसने वाढू लागलं.
आपण विचार करत असाल हे 1.1 डिग्री सेल्सियस किंवा 2 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढणं म्हणजे नक्की काय? तर, जसं आपल्या शरीराचं तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सियसने वाढलं तर आपली दैनंदिन दिनचर्चा प्रभावित होते आणि डॉक्टर म्हणतात, 'तुम्हाला ताप आलाय तो आधी व्यवस्थित नियंत्रणात आणूया. नाही तर त्यामुळे इतर शरीरिक समस्या उद्भवतील.'
आता पृथ्वीच्या बाबतीत Green House साठी Co2 Concentration 1750 (Pre Industrial age) च्या तुलनेत आता 48 टक्क्यांनी वाढलाय. ज्यामुळे पृथ्वी आपल्या वातावरणात जास्त उष्मा साठवून ठेवू लागली आहे व ती हळूहळू तिचं सरासरी तापमान वाढू लागलं. आता 0.1 डिग्री सेल्सियस प्रतीवर्ष या सरासरीने हे तापमान वाढू लागलंय.
हे असं का घडतंय याची प्रमुख कारणं आता आपण जाणून घेऊ
1. कोळसा, इंधन (तेल, वायू) जाळणे
2. जंगल तोड / वृक्ष तोड करणं
3. पशुपालन (गुरं ढोरं पाळणं)
IPCC 2014 (In govermental Panel on Climate Change) Sector Wise Emissions
1) Electricity - 25%, 2) Live Stock + Agriculture - 24%, 3) Industry - 21%, 4) Transportation - 14%, 5) Building Constrution - 6%,
6) Others - 10% = Total - 100% ( International Body for Accessmaent of Climate change. It is a key source of sciantific informet and technical guidance to United Nations Frame Work Convation on climate change )
आता नुकतीच घडलेली घटना "कोरोना परिस्थितीमुळे लोकडॉऊन"मध्ये पर्यावरणात चांगले बदल घडले. अनेक शहरांच्या/देशांच्या हवेची गुणवत्ता वाढल्याचं आपण ऐकलं/वाचलं असेल. म्हणजेच फक्त आपण सवयी सुधारल्या तर वातावरण आपोआपच ठीक होतं. अनावश्यक बाबी टाळून
आपण वैयक्तिकरित्या ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय योगदान देऊ शकतो? तर 1) Reduce Your Consuption, 2) Your food Habits, 3) Use Public Transport System
सरकार ( Government ) काय पावलं उचलतंय?
- Production of Electricity through Renewable Energy
- Moving Toward Solar & Wind
- Introduce Hydrogen Economy
- Strengthening Public Transport System
- Forestation
- Incentives to individuals or Organizations to become carbon neutral more Awarness Regarding
आता विचार करा "Global Warming" जागतिक हवामान बदल हा प्रत्येकाशी निगडित मुद्दा आहे. जसं आपण स्वतःला ताप आल्यावर लगेच औषध घेऊन बरे होऊ इच्छितो तसं आता "धरती मातेला" आलेला हा ताप दूर करण्यासाठी आपल्या सवयी बदलून योगदान दिलं पाहिजे. जर अशीच परिस्थिती राहिली आणि तापमान २ डिग्री सेल्सियसने वाढलं तर काय होईल विचार करा. पैसे, प्रॉपर्टी, जमीन - जुमला, पद, प्रतिष्ठा तशीच राहील पण जीवसृष्टीचा विनाश होईल. तेव्हा वेळीच "जागे व्हा."
( लेखक आयआयटी मुंबई येथे Energy Science & Engineering चे प्रोजेक्ट इन्चार्ज आहेत. )