Super Food For Baby: मुलं लहान असेल तर त्याच्या पालन-पोषणाची पालकांना सतत चिंता सतावत असते. लहान वयात मुलांची रोगप्रतिकार शक्तीदेखील कमजोर असते. तसंच, मुलांचे वाढते वय असल्यामुळं याच वयात त्यांची योग्य वाढ होत असते. अशावेळी त्यांच्या शरिरात सर्व जीवनसत्व, प्रथिनेयुक्त असा आहार जाईल, याची काळजी पालकच घेतात. आम्ही तुम्हाला आता असे पाच पदार्थ सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही मुलांच्या आहारात समावेश करु शकतात.
लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळं पौढ व्यक्तींच्या तुलनेत ते जास्त आजारी पडत असतात. इम्युनिटी कमी असल्याच्या कारणाने पालकांचे सतत त्यांच्या आहाराकडे लक्ष लागून राहिलेले असते. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवता यावी, अशा पदार्थांचा ते जेवणात समावेश करत असतात. त्यामुळं लहान मुलं कमी आजारी पडतील व सतत त्यांना डॉक्टरकडे न्यावे लागणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही सुपर फुड सांगणार आहोत ज्यांचा आहारात समावेश करुन मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवता येईल.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुकामेवा हा चांगला पर्याय आहे. यात पोषक तत्वे असतात. खनिजे, जीवनसत्वे, अँटी ऑक्सिडेंट, ओमेगा फॅटी अॅसिड सारखे पोषकत्तवे असतात. त्यामुळं लहान मुलांना आक्रोड, पिस्ता, बदाम खाण्यासाठी देऊ शकतात. तर, लहान बाळांना सुकामेवा भिजत ठेवून त्यानंतर त्यांची बारीक पावडरकरुन खायला देऊ शकतात.
तीनपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना तुम्ही थेट सुकामेवा खाण्यास देऊ शकतात. जर तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मगच त्याच्या अहारात समावेश करा. Naturemed.orgनुसार, सुकामेव्यामध्ये झिंक आणि सेलिनियम ग्लुटाथियोन नावाचे अँटीऑक्सिडेंट असतात. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते.
लहान मुलांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चीज. चीजमुळं रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. कारण त्यामध्ये झिंकची मात्रा अधिक असते आणि झिंक एखाद्या संसर्गापासून लढण्यासाठी शरिरात अँटीबॉडी बनवण्यास मदत करते. मुलांना चीज खायला देताना मात्र, एक सुचनेचे पालन करा ते म्हणजे चीज नेहमी सँडविच किंवा पराठ्यासोबत, पास्तासोबत देऊ शकता.
मशरुममध्येही झिंक असते ज्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. इतकंच नव्हे तर, मशरुममध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. परंतु, लहान मुलांना मशरुम खायला देताना एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा कारण अनेकदा मशरुममुळे अॅलर्जी उद्भवू शकते.
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन असते त्यामुळं शरिराला व्हिटॅमिन ए मिळते. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारात आजपासून गाजराचा समावेश करा. जर, तुमचे बाळ लहान असेल तर गाजराची प्युरी करुन त्याला खाऊ खालू शकता.