लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं

Child Health : लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. अशावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि मेंदूचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 4, 2024, 06:33 PM IST
लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स,  जीनियस होतील मुलं  title=

Foods For Better Memory : मुलांना अभ्यासासाठी चांगल्या स्मरणशक्तीची गरज असते जेणेकरून ते जे काही वाचतात ते लक्षात ठेवता येईल. स्मरणशक्ती आणि मेंदूची शक्ती वाढवण्यात आहाराचा मोठा वाटा आहे. काही पदार्थांचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हे पदार्थ मनाला तीक्ष्ण बनवतात आणि मेंदूला कार्य करण्यास मदत करतात. येथे वाचा अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल, जे केवळ स्मरणशक्तीच वाढवत नाहीत तर मेंदूही तीक्ष्ण करतात.

टोमॅटो

स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या टोमॅटोचाही ब्रेन फूडच्या यादीत समावेश होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे तत्व असते जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. मुलांना रोज टोमॅटो खायला द्या. यामुळे त्यांची मेमरी पॉवर (मेमरी पॉवर बूस्टिंग फूड्स) वाढेल आणि त्यांचे फोकसही वाढेल. मेंदूसाठी चांगल्या पदार्थांमध्ये टोमॅटोचाही समावेश होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन आढळते जे स्मरणशक्तीशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. टोमॅटोचे नियमित सेवन लहान मुलांचा मेंदू तीक्ष्ण ठेवण्यासाठी मदत होते. 

हिरव्या भाज्या 

काही अभ्यासानुसार, प्लांट बेस्ड डाएट म्हणजे आपल्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या या मेंदूच्या विकासासाठी अतिशय चांगल्या असतात. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. एवढंच नव्हे तर यामुळे मिनरल्स, व्हिटामिन्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स सहज मिळतात.  सर्व लोकांना हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. मुलांच्या मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या खूप उपयुक्त आहेत. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. संशोधनात असेही आढळून आले आहे की प्लांट बेस्ड पदार्थ स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.

सुकामेवा 

अनेक मुलांना सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स खायला आवडत नाहीत. पण पालकांनी याचा मुलांच्या आहारात समावेश करावा. कारण यामुळे झिंक, अँटीऑक्सिडेंट्स, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स यासारखे पोषकतत्त्व मिळतात. ड्रायफ्रुट्स तुम्ही लाडूच्या रुपात किंवा कच्चा स्वरुपातही खायला देऊ शकता. मुलांना सुका खाऊ म्हणून देखील डब्यात बदाम, काचू, मनुका देऊ शकता. 

मासे

 मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी माशांचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. काही अभ्यासानुसार मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आणि प्रथिने माशांमध्ये आढळतात ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो. तसेच यामध्ये असलेले ओमेगा 3 मुलांचे स्नायू मजबूत करण्यासही मदत करतात. 

तृणधान्ये 

मुलाचा आहार संतुलित करण्यासाठी त्याला गहू, बाजरी आणि इतर प्रकारचे धान्य खायला द्यावे. मज्जासंस्थेचे कार्य करण्यास मदत करणारे घटक संपूर्ण धान्यांमधून मिळू शकतात. या तृणान्यांचा आहारात वेगवेगळ्या प्रकारांनी समाविष्ट करु शकता. या पदार्थांचा सकारात्मक परिणाम मुलाच्या संपूर्ण शरीरावर होत असतो.