Belly Fat : आजकाल अनेकांमध्ये सुटलेलं पोट म्हणजेच बेली फॅटची (Belly Fat) समस्या दिसून येते. बेली फॅट (Belly Fat) वाढणं हे दिसायला तर विचित्र दिसतंच शिवाय, ते आरोग्यासाठी देखील खराब असतं. बेली फॅट (Belly Fat) कमी व्हावं, यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो, मात्र तरीही वजन कमी होताना दिसत नाही. पण वजन (Weight Loss) कमी न होण्यामागे नेमकं कारण काय याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
आपल्या शरीरात दोन प्रकारचे फॅट असतात. यामध्ये सबक्युटेनियस फॅट आणि विसरल फॅट असे याचे दोन प्रकार आहेत. शरीरात जेव्हा तुमच्या त्वचेच्या आतील बाजूस फॅट जमा होतं, त्याला सबक्युटेनियस फॅट असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे शरीरातील एखाद्या अवयवाच्या आजूबाजूला फॅट जमा होत असेल तर त्याला विसरल फॅट असं म्हटलं जातं. हे फॅट तुम्हाला दिसून येत नाही, मात्र हे फार धोकादायक मानलं जातं.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपण खूप मेहनत करतो. मात्र यावेळी नकळत आपल्याकडून काही चुका होतात. अनेकदा या चुकांकडे आपलं लक्ष देत नाही. परिणामी या छोट्या छोट्या चुका तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. या चुका नेमक्या कोणत्या आहेत, हे आपण जाणून घेऊया.
एक्टिव्ह न राहणं
शरीरात फॅट जमा होण्यामागे एक प्रमुख कारण असतं ते म्हणजे, तुम्ही एक्टिव्ह नसता. जर तुमच्या शरीराची हालचाल होत नसेल तर शरीरात फॅट जमा होऊ लागतं. जर तुम्ही दिवसभरात कोणतीही फिजीकल एक्टिव्हिटी करत नसाल तर पोटावरील चरबी कमी होणार नाही. जर तुम्ही दररोज एक्सरसाईज करत असाल तर तुमच्या पोटाजवळ चरबी जमा होणार नाही. त्यामुळे एक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे.
प्रोटीनच्या प्रमाणाची कमतरता
जर तुम्ही घेत असलेल्या आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमच्या पोटाजवळची चरबी कमी करणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या डाएटवर लक्ष द्या. जर तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतील तर बेली फॅट होण्यापेक्षा वाढू लागेल. अशावेळी प्रोटीन घ्यावं म्हणजेच आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
अपूर्ण झोप
ज्यावेळी तुमची झोप पूर्ण होत नाही त्यावेळी शरीरामध्ये कार्टिसोल हार्मोन्स वाढेल. तुमच्या शरीरात जर हे हार्मोन वाढलं तर मेटॉबॉलिझम हळू होतं. ज्यावेळी मेटाबॉलिझम रेट स्लो होतो तेव्हा तुमचं वजन वाढतं आणि पोटाकडील चरबी वाढू लागते. त्यामुळे पुरेशी झोप घेतली पाहिजे.