Benefits of Sleeping on the Floor: आपल्याला अनेक कधी कोणत्या गोष्टींचा फायदा होईल हे काहीच सांगता येत नाही. त्यातून तुम्हाला माहितीये का की जमिनीवर झोपण्याचेही अनेक फायदे आहेत. आपण ऑफिसमध्ये सतत बसून असतो त्यामुळे आपली पाठ ही सतत दुखू लागते, आपले हात-पाय, शरीरही वेदनांना भरून जाते. आपल्याला आपल्या शरीराला मोकळं करणं हे फार गरजेचे असते. त्यामुळे ऑफिसवरून आपल्याला आपण इतके दमलेले असतो की आपण सरळ बेडवर झोपूनच जातो. परंतु तुम्हाला माहितीये का की जमिनीवर झोपण्याचेही पुष्कळ फायदे आहेत. आपण अनेकदा कोणी जमिनीवर झोपलेलं कोणाला पाहिलं तर त्यांना म्हणतो, अरे उठा तुमची पाठ दुखेल, लचकेल, असं म्हणतो. त्यामुळे आपणही सतर्क राहतो. परंतु तुम्हाला माहितीये का जमिनीवर झोपण्यानं तुमचं काहीच नुकसान होणार नाही. तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की जमिनीवर झोपण्याचे काय फायदे आहेत.
आपल्याला जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे मिळू शकतात. त्यातून फक्त जमिनीवर झोपताना फक्त जमिनीवर उताणे पडू नका. जमिनीवर झोपताना काळजी घ्या की तुम्ही चादर किंवा चटई घालून झोपाल. कारण अर्थातच जमीन ही थंड असते आणि त्यावर झोपल्यानं तुमच्या हाडांना त्रास होऊ शकतो. यावेळी जाणून घेऊया की बेडपेक्षा जमीनीवर झोपल्याचे तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात. यावेळी तुम्ही एसी लावून झोपणंही टाळा. जास्त करून बाहेरची थंड स्वच्छ हवा जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खोलीची खिडकी उघडून झोपू शकता.
त्यातून जमिनीवर झोपण्याचे तोटेही अधिक असतात. एक म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे जमीन ही खूप थंड असते. त्याचसोबत त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरही होऊ शकतो. यावेळी जमीनवरील बॅक्टेरियानं आपल्याला एलर्जीही होऊ शकते. तसेच जास्तवेळ जमिनीवर लोळू नका.
तुम्हाला जर का दुपारी किंवा रात्री संपुर्ण वेळ झोपायच्या आधी वेळ मिळाला तर तुम्ही असंही झोपू शकता. परंतु झोपताना हे लक्षात घ्या की तुम्ही थंड जमिनीवर तर झोपत नाही आहात ना?
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)