नवी दिल्ली : अक्रोड खाल्याने रोगांना अटकाव होण्यास मदत होते, अशी माहिती कॅलिफोर्निया व्हॉलनट कमिशन (सीडब्ल्यूसी) च्या एकदिवसीय बैठकीत झालेल्या वैज्ञानिक आणि स्वास्थ्य संमेलनात समोर आली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मूठभर अक्रोडमध्ये ४ ग्रॅम प्रोटीन, २ ग्रॅम फायबर आणि मॅग्नेशियम असते.
कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. एचके. चोपडा यांनी सांगितले की, "ओमेगा-3, अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असलेले अक्रोड हे एकमेव फळ आहे. जे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."
पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असे हे फळ वर्षभर तुम्ही खाऊ शकता. कॅलिफोर्निया व्हॉलनट कमिशन (सीडब्ल्यूसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल मॅकनील कॉनेली यांनी सांगितले की, "वैज्ञानिक आणि स्वास्थ्य संमेलनात भारतातील आहार पद्धती, आरोग्याची अस्वस्था, आजार आणि स्वस्थ जीवनशैली यावर चर्चा करण्यात आली."