अचानक ब्लड प्रेशर वाढत असेल तर, करा या 3 गोष्टी; लगेच मिळेल आराम

तुम्ही पाहिलेच असेल की, बऱ्याच लोकांचं बीपी किंवा हायपरटेन्शन अचानक वाढते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात. 

Updated: Mar 29, 2022, 04:39 PM IST
अचानक ब्लड प्रेशर वाढत असेल तर, करा या 3 गोष्टी; लगेच मिळेल आराम  title=

मुंबई : लोकांना त्यांच्या खराब जिवनशैलीमुळे स्वत:ला आणि आरोग्याला देण्यासाठी वेळ नसतो, ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर हळूहळू दिसू लागतो. ज्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागतात. त्यात उच्च रक्तदाबाचे रुग्ण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत, मोठ्या संख्येने लोक याला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय अवलंबत आहेत, परंतु हा आजार त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. अशा लोकांना औषधांचा आधार घ्यावा लागतो.

तुम्ही पाहिलेच असेल की, अनेक वेळा बीपी किंवा हायपरटेन्शन अचानक वाढते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात. परंतु याला सामोरे जाण्यासाठी, घाबरण्याऐवजी, आपण शहाणपणाने वागले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही त्याला कंट्रोल करु शकाल. चला तर मग जाणून घेऊया बीपी अचानक वाढल्यास काय करावे.

1. व्यायामाची सवय लावा

आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा रक्तदाब किंवा बीपी वाढतो तेव्हा रुग्णाला गंभीर डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे आणि त्वचेवर लाल पुरळ दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. असे मानले जाते की, जर तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर व्यायामासोबतच पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करावा.

2. व्हिटॅमिन-सीचे सेवन करावे

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-सीचे सेवन केले पाहिजे. वास्तविक, लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये तुम्ही द्राक्षे, संत्री आणि लिंबू खाऊ शकता.

3. बेरी खाव्यात

याशिवाय बेरीच्या साह्यानेही बीपी नियंत्रित करता येतो. ते खाल्ल्याने तुमचे बीपी नियंत्रणात राहते. अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स समृद्ध बेरी केवळ आपलं शरीर निरोगी ठेवत नाहीत तर यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)