High Cholesterol Lowering Tips : गेल्या काही महिन्यांपासून कमी वयात अचानक लग्न समारंभात, कुठल्या तरी कार्यक्रमात अगदी जीममध्ये लोकांना हृदविकाराच्या झटक्यामुळे (heart attack) मृत्यू झाला आहे. खराब जीवनशैली आणि खराब आहार यांमुळे आजकाल तरुण वयातही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल (bad cholesterol LDL Cholesterol) हे देखील हृदयविकाराचं एक प्रमुख कारण आहे. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाड रंगाचा मेणासारखा पदार्थ सतत तयार होतो, जो नलिकांना ग्रीसिंगचं काम करतो. यालाच आपण कोलेस्टेरॉल म्हणतो, पण जर हे कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात जमा होऊ लागले तर रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ लागतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यास वेळ लागत नाही. मग अशात तुम्हाला तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रण (How to control cholestrerol) ठेवण्याची गरज आहे. (cholesterol control Green Chutney home remedies for remove LDL how to reduce high cholesterol in marathi)
आज आम्ही तुम्हाला अशा हिरव्या चटणीबद्दल सांगणार आहोत (home remedies for remove cholesterol), जी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते आणि तुमच्या धमन्या स्वच्छ करते.
ही चटणी (cholesterol control Green Chutney) बनवण्यासाठी 20 ग्रॅम लसूण, 20 ग्रॅम पुदिना, 15 ग्रॅम इसबगोल, 10 मिली लिंबाचा रस, 50 ग्रॅम धणे (Coriander), 1 हिरवी मिरची, थोडे मीठ, 15 ग्रॅम जवस तेल आणि थोडे पाणी घ्या. या सर्व गोष्टी वरवंट्यावर वाटून घ्या. जर तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या सर्व गोष्टी ब्लेंडरमध्ये टाकून पातळ पेस्ट म्हणजेच कोलेस्ट्रॉल कंट्रोल चटणी (Cholesterol Control Chutney) बनवू शकता.
डॉक्टरांच्या मते, धणे (Methi Khane Ke Fayde) आणि पुदिन्याच्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल (chlorophyll benefits) आढळते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यातील प्रथिनांची मुबलक मात्रा खराब कोलेस्टेरॉल (How to Reduce High Colesterol) कमी करण्याचं काम करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका आपोआप कमी होतो. याचं नियमित सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.
या चटणीमध्ये इसबगोल (isabgol benefits in cholestrerol) आणि जवसाच्या बिया (flax seeds benefits) मिसळून घेतल्यास शरीरासाठी खूप फायदा होतो. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते रामबाण उपाय म्हणून काम करते. यामुळे शरीरातील ट्राइग्लिसराइड्स (triglycerides how to reduce) आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येऊ लागते. त्यामुळे शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढू लागतो.
तर कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. उच्च घनता लिपोप्रोटीन ज्याला एचडीएल (HDL) किंवा चांगले कोलेस्टेरॉल असं म्हणतात. तर कमी घनता लिपोप्रोटीन ज्याला एलडीएल (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)